Take a fresh look at your lifestyle.

कोणी नोकरी देता का नोकरी..? एप्रिलमध्ये पहा किती लोक झालेत बेरोजगार?

नवी दिल्ली : कोरोना संसर्गामुळे रुग्णाच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असताना, आता लोकांवर उपासमारीने मरण्याची वेळ आली आहे. कारण, कोरोनामुळे महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन (lockdaun) करण्यात आले आहे. शिवाय अन्य काही राज्यातही कडक निर्बंध लादले आहेत. परिणामी, उद्योग-धंदे बंद पडले. आज ना उद्या परिस्थिती सुधारेल, अशी आशा वाटत होती, मात्र गेल्या वर्षभरापासून त्यात काहीही फरक पडलेला नाही. त्यामुळे नुकसान सहन करण्याची उद्योजकांचीही क्षमता संपली आहे. काहींनी ‘कॉस्ट कटिंग'(Cost Cutting) केले, तर काहींनी थेट उद्योग-धंदेच बंद करून टाकले.

Advertisement

देशात कोरोनाची दुसरी लाट थैमान घालत असताना, लॉकडाउनचे संकट दिवसेंदिवस अधिकच गडद बनू लागले आहे. राज्यांच्या पातळीवर सुरु असलेल्या लॉकडाउनमुळे यापूर्वीच छोट्या-मोठ्या उद्योगांना फटका बसला आहे. लाखो कामगार बेरोजगार झाले आहेत.

Advertisement

‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’च्या (CMIE) ताज्या अहवालात बेरोजगारीचे भीषण वास्तव समोर आले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एप्रिल महिन्यात तब्बल ७५ लाख लोक बेरोजगार झाल्याचे ‘सीएमआयई’ ने म्हटलं आहे.

Advertisement

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहा:कार उडवला आहे. आरोग्य यंत्रणेची पुरती दमछाक झाली आहे. येणारा काळ तर रोजगार संधीच्या दृष्टीने आव्हानात्मक असल्याचे मत ‘सीएमआयईई’चे संचालक महेश व्यास यांनी व्यक्त केले आहे.

Advertisement

ते म्हणाले, की “स्थानिक पातळीवरील कठोर लॉकडाउनमुळे एप्रिल महिन्यात ७५ लाख लोक बेरोजगार झाले. यामुळे या महिन्यात बेरोजगारीचा दर ८ टक्क्यांसमीप गेला आहे. मागील चार महिन्यातील बेरोजगारीचा हा उच्चांकी दर आहे.”

Advertisement

केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, राष्ट्रीय बेरोजगारी दर ७.९७ टक्के झाला आहे. शहरी भागातील बेरोजगारी दर ७.१३ टक्के आहे, तर ग्रामीण भागात बेरोजगारी दर ७.१३ टक्के आहे. यापूर्वी मार्च महिन्यात राष्ट्रीय बेरोजगारी दर ६.५० टक्के होता.

Advertisement

कोरोनाच्या साथीचे कधी निर्मूलन होईल, याची आपल्याला माहिती नाही; मात्र बेरोजगारीचे संकट आणखी काही महिने कायम राहील, असे व्यास यांनी सांगितले. दरम्यान, पहिल्या लॉकडाउनच्या तुलनेत अजूनही बेरोजगारीची स्थिती तितकी गंभीर नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या वर्षी देशात बेरोजगारीचा दर २४ टक्क्यांवर गेला होता. कोट्यवधी कामगारांना लॉकडाउनमुळे नोकरी गमवावी लागली होती.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement

Advertisement

Leave a Reply