Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आरोग्यदायी माहिती : घरातील ‘या’ पदार्थाची घ्या वाफ; मग ऑक्सिजन लेव्हल राखायलाही होईल मदत

घरातील काही पदार्थाची वाफ घेतल्याने फुफ्फुसे स्वच्छ व निरोगी राहण्यासह छातीमधील कफ कमी होण्यास मदत होते. याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. प्रत्येक व्यक्ती निरोगी असते पण अचानक बदललेले वातावरण आणि खाण्यापिण्यात झालेला बदल, वायरल इनपेक्शन, इतर संक्रमण इत्यादी कारणांमुळे ज्यांची प्रतिकारशक्ती कमी असते त्याचा घसा प्रथम खवखवतो, आवाज बदलतो आणि लक्ष न दिल्यास पुढे सर्दी होते. अजूनही हे सगळे अंगावर काढल्यास छातीस कफ होतो. हा छातीतील कफ लवकर कमी न झाल्यास फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होते. वारंवार खोकला येतो, ताप येतो.

Advertisement

अशावेळी शरीरास आवश्यक असणारा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे काय होऊ शकते हे आपण आता चांगलेच जाणतो. सध्याच्या या भीतीयुक्त वातावरणामध्ये असे कोणतेच दुखणे अंगावर काढू नका. लगेच दवाखान्यात दाखवा. या दिवसात योग्य तो घराचा आहार घ्या. व्यायाम व योगासने करा. तसेच काही घरगुती उपायांचा वापर करा. ज्याने तुमची प्रतिकारशक्ती तुमच्या शरीरातील ऑक्सिजन लेव्हल नेहमी योग्य राहील.

Advertisement

अशा या घरगुती आयुरवैदिक स्टीम साठी कोणते कोणते पदार्थ लागतात ते खालील प्रमाणे :

Advertisement

गवती चहा : छातीतील चिवट कफ जाण्यासाठी बऱ्याच व्यक्तींना दवाखान्यात वाफ दिली जाते. अशीच आयुर्वेदिक स्टीम घरच्या घरी कशी करायची हे आज आपण पाहणार आहोत. यासाठी सर्वप्रथम लागणारा पदार्थ म्हणजे गवती चहा. गवती चहा उष्ण आहे. गवती चहामध्ये असणारे antibacterial घटक शरीरातील कफ मोकळा होण्यास मदत करतात. तसेच याचा सुगंध हा डोकेदुखी व सर्दी कमी होण्यास उपयुक्त ठरतो.

Advertisement

तुळस : दिवसभराचा थकवा दूर करणारे घटक तुळशीमध्ये असतात. तुळशीमध्ये मोठया प्रमाणात antibectereil गुण असतात. जे रोग प्रतिकार शक्ती मजबूत करण्याचे काम करतात. तसेच तुळशीच्या वासाने फ्लूचा धोकाही कमी होतो. शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. म्हणून तुळशीची पाने स्वच्छ धुवून घरी आणा. आणल्यानंतर सर्व पाने वेगळी करून वापरा.

Loading...
Advertisement

ओवा : ओवा हा शरीरातील प्रतिका शक्ती वाढवण्याबरोबरच शरीरामध्ये असणारे विद्रव्ये घटक बाहेर काढण्यास अत्यंत लाभदायी ठरतो. छातीमध्ये असणारा कसल्याही प्रकारचा कफ, खोकला तसेच वारंवार होणारी सर्दी यासाठी ओवा अत्यंत उपयुक्त ठरतो. ओव्याचा नुसता वास घेतला तरी नाक मोकळे होते. अशा या ओव्यामध्ये थायमोलचे, फॉसस्फरस, लोह इत्यादी घटक शरीरातील हानिकारक तत्वे बाहेर काढण्यास मदत करतात. म्हणून ज्यांना सर्दी, खोकला, श्वास घेण्यास होणारा त्रास, श्वसनासंबंधी तक्रारी कमी करायच्या असतील त्यांच्यासाठी ओवा अत्यंत उपयुक्त ठरतो.

Advertisement

वाफ घेण्यासाठीची कृती खालीलप्रमाणे :

Advertisement

छोटा चमचा ओवा एकदम बारीक करून घ्या. एका पातेल्यात ग्रॅसवर एक ग्लास पाणी घ्या. या पाण्यामध्ये तुळशीची पाने व्यवस्थित कुसकरून सोबतच गवती चहाचे बारीक-बारीक तुकडे करून यामध्ये टाका. यासोबत बारीक केलेला ओवा देखील त्यामध्ये टाका. सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत उकळा. एकजीव झाल्यानंतर हे मिश्रण आपल्या समोर घ्या. त्यानंतर एक कपडा अंगावर घेऊन वाफ घ्या. यामुळे सर्दी निघून जाईल व घसा मोकळा होईल. सोबतच डोके दुखी व सायनस कमी होईल. फुफ्फुसाची कार्यक्षमता लेव्हल वाढण्यास यामुळे मदत होईल. असा अत्यंत महत्वपूर्ण उपाय करून पहा तुम्हाला त्याचा निश्चितच फायदा होईल.  

Advertisement

संपादन : रुपाली दळवी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply