Take a fresh look at your lifestyle.

आणि ‘त्या’ रोगामुळे दगावल्या 19 गायी; अशी घ्या जनावरांची काळजी

अहमदनगर :

Advertisement

एकीकडे जगभरात करोनाचे थैमान चालू असतानाच अहमदनगर जिल्ह्याच्या काही भागात आता गोठ्यातील पाळीव जनावरांना लाळ्या खुरकुत व घटसर्प या रोगाची लागण झाली आहे. त्यामुळे नेवासा तालुक्यातील तब्बल 19 गायी दगावल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने याप्रकरणी कार्यवाही सुरू केली आहे.

Advertisement

 भेंडा खुर्द व जेऊर हैबती गावातील  हरिभाऊ नवले यांच्या ३, रवींद्र नवले यांच्या ३, गंगाराम शिंदे यांच्या ५, तर अशोक देशमुख व गजानन देशमुख यांच्या ८ अशा एकूण १९ गाई दगावल्याची माहिती डॉ. दिनेश पंडुरे (तालुका पशुवैद्यकीय आरोग्य अधिकारी) यांनी दिली आहे. जेऊर येथील अशोक देशमुख व भेंडे येथील हरिभाऊ नवले यांच्या दगावलेल्या गाईंचे शवविच्छेदन करून त्याचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. जेऊर येथील एका गाईमध्ये घटसर्प सदृश्य लक्षणे आढळली. मात्र अहवाल अहवालानंतर नेमके कारण स्पष्ट होईल.

Advertisement

तर, जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंबारे यांनी या भागातील गोठ्यांना भेट दिली आहे. या भागात ऊस तोड कामगार व त्यांची जनावरे येत असतात. ऊस तोडणी कामगारांचे बैल जास्त प्रमाणावर लाळ्या खुरकुतने बाधित असल्याने ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणवठ्याजवळ किंवा गोठ्याजवळ ऊस तोड कामगारांचे निवासी अड्डे आहेत, तेथील शेतकऱ्यांचे जनावरे बाधित होण्याचे प्रमाण अधिक असल्याने बाधित पशुंची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे जनावरांचे योग्य ते लसीकरण करावे. तसेच बाधित जनावरांच्या संपर्कात आपली निरोगी जनावरे येणार नाहीत याचीही काळजी घ्यावी.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply