Take a fresh look at your lifestyle.

कोट्यावधींचे नुकसान; लाखो कोंबड्यांनी अंडी देणे केलेय बंद, पोल्ट्री फीड कंपनीवर कार्यवाही सुरू..!

पुणे :

Advertisement

अंडी देणाऱ्या कोंबड्यांना (लेअर फार्मिंग) दिलेल्या खाद्यामुळे कोंबड्या अंडी देणेच बंद झाल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यात घडली आहे. याप्रकरणी तब्बल 27 शेतकऱ्यांनी थे पोलिसात धाव घेतली आहे. त्यानुसार आता पोलिसांनी पुढील कार्यवाही सुरू केली आहे. दरम्यान, कंपनीने अजूनही याबाबत आपली भूमिका जगजाहीर केलेली नाही.

Advertisement

कंपनीने दिलेले भेसळयुक्त खाद्य कोंबड्यांना दिल्याने त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्याने सुमारे 1 लाख कोंबड्यांनी अंडी देणे बंद केल्याची तक्रार पुण्यातील लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात दाखल झालेली आहे. जाफा कॅमफिड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या पारनेर येथील प्लांटमध्ये सदर पोल्ट्री खाद्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. 11 एप्रिल 2021 रोजी शेतकऱ्यांनी हे खाद्य आणले होते.

Advertisement

याप्रकरणी लक्ष्मण मुकुंद भोंडवे, गिरीश दिगंबर चंद, अनिल जवळकर, गोरख विचारे, विनोद दत्तात्रय भोंडवे, धनंजय नारायण डांगे (रा. आळंदी म्हातोबाची, ता. हवेली) यांच्यासह 27 शेतकऱ्यांनी पोलिसांकडे धाव घेतलेली आहे. राजेंद्र मोकाशी (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लोणी काळभोर) यांनी याबाबत सांगितले आहे की, कंपनीकडून खरेदी करण्यात आलेल्या खाद्याचे नमुने तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येणार आहेत. त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.

Advertisement

कोंबड्यांना खाद्य दिल्यानंतर तीनच दिवसांनी सुमारे 1 लाखांपेक्षा जास्त कोंबड्यांनी अंडी देणेच बंद केले आहे. उन्हाळ्यात अंडी कमी दराने विकली जातात. मात्र, कोरोनाच्या महामारीमुळे होलसेल मार्केटला सध्या अंड्याचे भाव 5.20 रुपये आहेत. यानुसार प्रतिअंड्याचा भाव लक्षात घेता कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे, असल्याची माहिती पोल्ट्री व्यावसायिक लक्ष्मण भोंडवे यांनी दिली आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply