आणि पोल्ट्री उत्पादकांना बसला झटका; ‘त्या’ कंपनीचे फीड दिले, न कोंबड्यांनी अंडी देणेच बंद केले..!
अहमदनगर / पुणे :
पोल्ट्री हा एक खूप सेन्सेटिव्ह विषय आहे. वातावरणाचा परिणाम आणि खाद्य-पाणी या घटकांमुळेही कोंबड्यांवर पटकन दुष्परिणाम दिसतात. अशाच या सेन्सेटिव्ह बिजनेसला फटका बसल्यावर उत्पादक कुक्कुटपालक शेतकऱ्यांना अनेकदा मोठा आर्थिक झटका सहन करावा लागतो. शेती क्षेत्राप्रमाणेच यातही अनेक कंपन्या कार्यरत असून त्यांनी क्वालिटीकडे दुर्लक्ष केल्यावर मोठे आर्थिक नुकसान होते. तसाच प्रकार आळंदी म्हातोबाची (ता. हवेली, जि. पुणे) येथील शेतकऱ्यांना सध्या सहन करावा लागत आहे.
याप्रकणी शेतकऱ्यांनी थेट पुणे ग्रामीण पोलिसांकडे तक्रार केली आहे. ‘भेसळयुक्त खाद्य देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केल्याबद्दल’ची तक्रार फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी दिली आहे. त्यात म्हटले आहे की, आम्ही सर्व शेतकऱ्यांनी दि. ११ एप्रिल २०२१ रोजी जाफा कॉमफीड इंडिया प्रा. लिमिटेड (प्लॉट नंबर अ ११, एमआयडीसी, सुपा-पारनेर ग्रोथ सेंटर, ता. पारनेर, जि. अहमदनगर) येथून फीड घेतले होते. त्या फीडमध्ये भेसळ असल्या कारणाने कोंबड्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला. सर्व कोंबड्यांनी अचानक अंडी देण्यास बंद केले. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. पोलिसांनी याप्रकरणी योग्य तो तपास करून न्याय मिळवून द्यावा.
लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी ठाणे अंमलदार यांनी तक्रार घेतली आहे. दि. २० एप्रिल २०२१ ला पोलिसांनी तक्रार घेऊन याप्रकरणी कार्यवाही सुरू केली आहे. या तक्रार अर्जावर लक्ष्मण मुकुंद भोंडवे, गिरीश दिगंबर चंद, अनिल जवळकर, गोरख विचारे, विनोद भोंडवे आणि संजय डांगे या शेतकऱ्यांनी स्वाक्षरी केलेली आहे. याप्रकरणी जाफा कॉमफीड इंडिया प्रा. लिमिटेड यांच्या सुपा साईटवर ०२४८८ २४३५०१ आणि विमाननगर (पुणे) येथील ०२० ३०५३ ७८०० या टेलीफोन क्रमांकावर कृषीरंग टीमने संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावर फोन लागू शकला नाही. परिणामी याबाबत कंपनीचे नेमके काय म्हणणे आहे हे समजू शकलेले नाही. *(मात्र, त्यांची याबाबत प्रतिक्रिया किंवा म्हणणे आले तर कृषीरंग पोर्टलवर त्यास प्रसिद्धी दिली जाणार आहे.)
संपादन : सचिन मोहन चोभे
- कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
- | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.
- ता. क. आपल्या भागातील अशाच शेतीकथा, शेतीव्यथा, यशकथा, शेतीचे प्रश्न, प्रयोग आणि कृषी व ग्रामीण विकासाच्या बातम्या, व्हिडिओ आणि लेख आपण krushirang@gmail.com या ईमेलवर पाठवून द्या. संबंधित शेतकरी, लेखक व व्हिडिओग्राफर यांच्या नाव व पत्त्यासह त्यास आम्ही ठळक प्रसिद्धी देऊ.
- भाजप खेळणार मास्टरस्ट्रोक: देशाला मिळणार पहिला आदिवासी राष्ट्रपती?; ‘या’ नावांची चर्चा
- .. म्हणून मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात केली कपात; समजून घ्या एक एक गोष्ट
- टीम डेव्हिडचा मोठा खुलासा; RCB च्या ‘या’ खेळाडूने सामन्यापूर्वी दिला होता ‘हा’ संदेश
- Corona Update : देशात सलग चौथ्या दिवशी सापडलेत ‘इतके’ नवे रुग्ण; वाचा, महत्वाची माहिती..
- Weather Update : आज ‘या’ राज्यांत येणार वादळ आणि पाऊस.. हवामान खात्याने दिलाय अलर्ट; जाणून घ्या..