Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

म्हणून फेसबुकने गुंडाळली ‘ती’ योजना; पहा नेमके काय आहे भाजप कनेक्शन..!

मुंबई :

Advertisement

युरोपातील ‘द गार्डियन’ या वृत्तपत्राने सुप्रसिद्ध श्रीमंत मार्क झुकेरबर्ग यांच्या फेसबुक कंपनीच्या पोलिटिकल कनेक्शनचा पर्दाफाश केला आहे. त्यानुसार या कंपनीने तब्बल 20-25 गरीब व विकसनशील देशात राजकीयदृष्ट्या सत्ताधारी मंडळीशी घरोबा केल्याच्या दाव्याला काहीअंशी का होईना पुष्टी मिळाली आहे. आता तर भारतातही या कंपनीने काही वेगळेच केल्याचे ‘द गार्डियन’ने आपल्या बातमीत म्हटले आहे.

Advertisement

फेसबुकच्या एक माजी डेटा सायंटिस्ट सोफी झांग यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे या जगप्रसिद्ध माध्यम समूहाने फेसबुकवर बातम्या प्रसिद्ध केलेल्या आहेत. भारताचाही उल्लेख त्या बातमीमध्ये आलेला आहे. फेसबुकने भारतात बनावट खाती हटवण्याची योजना तयार करून कार्यवाही सुरू केली होती. त्यासाठी बनावट खाते शोधण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम या कंपनीने हाती घेतला होता. मात्र, अखेरीस त्यात  एक भाजप खासदार थेट सहभागी असल्याचे पुरावे आढळले आणि कंपनीने हा प्रकल्प गुंडाळला असल्याचा दावा सोफी झांग यांनी केला आहे. काँग्रेस नेटवर्कचाही उल्लेख त्यात आलेला आहे.

Advertisement

नोव्हेंबर 2020 मध्ये सुमारे 500 चेकपॉइंटवर काही खात्यांचे आणि चार नेटवर्कची पडताळणी केली. त्याद्वारे याचे भाजप कनेक्शन स्पष्ट झाले होते, असे सोफी झांग यांनी म्हटलेले आहे. बनावट लाइक्स, शेअर्स, कमेंट्स आणि रिअॅक्शन्सचा प्रसार करून आपला आणि पक्षाचा प्रचार करण्याचे प्रयत्न केले जात होते. याद्वारे खोटी आणि बनावट माहितीही प्रसारित केली जात आहे. त्यामुळे त्याचा राजकीयदृष्ट्या थेट फायदा घेण्याचा हा कार्यक्रम असल्याचे स्पष्ट होत आहे.

Loading...
Advertisement

चार नेटवर्कचा शोध  घेतल्यावर पैकी दोन-दोन नेटवर्क भाजप व काँग्रेसच्या समर्थनार्थ काम करत होते. चेकपॉइंट प्रणालीद्वारे भाजप खासदाराच्या सहभागाची माहिती मिळाली होती. ही प्रणाली युजरला त्याच्या खऱ्या नावासह फक्त एक खाते ठेवण्याची परवानगी देणारी एक चांगली गोष्ट आहे. त्याद्वारे बनावट खाते बंद करणे शक्य आहे. मात्र, त्यालाच फेसबुकने भारतात ब्रेक लावला आहे. यातील भाजप खासदाराचे नाव माहीत असून ठोस पुरावे मिळाले की त्याचे नाव उघड केले जाणार असल्याचे ‘द गार्डियन’ने आपल्या बातमीत म्हटले आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply