Take a fresh look at your lifestyle.

शेळीपालन : लसीकरणाचे वेळापत्रक नक्की फॉलो करा; वाचा आणि अंमलबजावणीही करा

शेळ्यांच्या आहाराकडे लक्ष देण्यासह रोगराईबाबतही काळजी घ्यावी लागते. यामध्ये आजाराची वाट न पाहता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लसीकरण (vaccination for good health) करण्याची नक्की काळजी घ्या. अशा पद्धतीने लसीकरण करून आपण गोट फार्मिंगला नफ्याकडे नक्कीच नेऊ शकतो.

Advertisement

जीवाणूजन्य रोग :

Advertisement
रोग/आजाराचे नावप्रथम मात्रा (वय)बुस्टर मात्रा (डोस)वार्षिक कार्यक्रमलसचे नाव व मात्रा
आंत्रविषार३-४ महिने२१ दिवसांनी पुन्हाप्रत्येक वर्षीमल्टीकाम्पोनंट (२.५ मिली कातडीखाली)
घटसर्प३-४ महिने२१ दिवसांनी पुन्हाप्रत्येक वर्षीघटसर्प लस (२.५ मिली त्वचेखाली)
फुफुसदाह३.४ महिने२१ दिवसांनी पुन्हाप्रतिवर्षी डिसेंबर महिन्यातसीसीपीपी (०.२ मिली कानाच्या टोकाच्या त्वचेत)
फाशी (गरजेनुसार)३-४ महिने२१ दिवसांनी पुन्हाप्रतिवर्षी एप्रिल-मे महिन्यात०.५ मिली त्वचेखाली

विषाणूजन्य रोग :

Advertisement
रोग/आजाराचे नावप्रथम मात्रा (वय)बुस्टर मात्रा (डोस)वार्षिक कार्यक्रमलसचे नाव व मात्रा
सांसर्गिक आंतरसंस्था दाह (पीपीआर)४ महिने ३ वर्षानंतरआरपीटीसी लस (१ मिली त्वचेखाली)
लाळखुरकुत३ महिने२१ दिवसांनी पुन्हाप्रत्येक ६ महिन्यांनीरक्षा (१ मिली त्वचेखाली)
शेळ्यांचा देवी रोग३.५ महिने२१ दिवसांनी पुन्हाप्रतिवर्षी२.५ मिली त्वचेखाली

संदर्भ : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर. (MPKV, Rahuri)

Advertisement

संपादन व लेखन : सचिन मोहन चोभे

Advertisement

वाचक बंधू-भगिनींनो, आपण ‘कृषीरंग’वर दररोज शेळी पालन (Goat Farming) या विषयावरील माहितीची मालिका प्रसिद्ध करणार आहोत. यामध्ये महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीसह जगभरातील गोट फार्मिंग ट्रेंड आणि संशोधन याबाबतची माहिती आपण घेणार आहोत. सध्या या व्यवसायाला ‘अच्छे दिन’ आल्याच्या बातम्या माध्यमांतून येतात. अशावेळी या व्यवसायाचे वास्तव आणि व्यावहारिक भान देण्याचा हा प्रयत्न आहे. आपणास कोणत्याही सूचना व मार्गदर्शन करावेसे वाटल्यास krushirang@gmail.com या इमेलद्वारे आपण आम्हाला संपर्क करू शकता. तसेच नियमित बातम्यांचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय न्यूज अपडेट आणि कृषी-ग्रामीण विकासाची माहिती पाहण्यासाठी आमचे www.facebook.com/Krushirang (कृषीरंग) हे फेसबुक पेज लाईक व फॉलो करा. ही माहिती आवडल्यास इतर शेतकऱ्यांना माहितीसाठी शेअर करा. @टीम कृषीरंग

Advertisement

Advertisement

Leave a Reply