Take a fresh look at your lifestyle.

पीकपद्धतीचे नफा वाढवणारे ‘हे’ मुद्दे वाचा आणि शेतात त्यांचा वापरही करा

परंपरागत शेतीपद्धतीमध्ये असणारे चांगले मुद्दे कायम ठेवतानाच, कालबाह्य झालेले घटक हद्दपार करावे लागतील. आणि त्याचवेळी नव्याने चांगल्या तंत्रांचा अवलंब शेतात करावा लागणार आहे. एकूणच जुन्या-नव्याचा योग्य संगम घालून शेती करावी लागणार आहे. शेतीत उत्पादनखर्च कमी करून नफा वाढवणारे तंत्र बहुसंख्य शेतकरी वापरत आहेत. आता प्रत्येक शेतकऱ्यांना याचा अवलंब करावाच लागेल.

Advertisement

शेतीमध्ये असलेला सरकारी हस्तक्षेप ही मोठी डोकेदुखी आहे. मात्र, त्याला आता पर्याय नाही. कारण, श्रीमंत व मध्यमवर्गीय यांच्या आवाजापुढे शेतकऱ्यांचा आवाज एकदम क्षीण झालेला आहे. त्यातही कोरडवाहू शेतकऱ्यांना या व्यवस्थेत अजिबात स्थान नाही. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांची आर्थिक बेअब्रू रोखण्यासाठी कोणताही श्रीकृष्ण या कलियुगात येण्याची शक्यता नाही. अशावेळी शेतकऱ्यांनाच यातून मार्ग काढावा लागणार आहे.

Advertisement

तर, यानिमित्ताने आज आपण पीकपद्धतीचे काही महत्वाचे मुद्दे पाहणार आहोत.

Advertisement
  • शेतीमध्ये कमी उत्पादन खर्चात पिकाचे दर्जेदार उत्पादन घेणाऱ्या ट्रीक वापरा.
  • खत, कीटकनाशक आणि पाण्याचा बेसुमार वापर टाळा.
  • पाणी उपलब्ध असल्यास बहुवार पीकपद्धती चा अवलंब करावा. त्यामध्ये कमी कालावधीत येणाऱ्या भाजीपाला पिकांचाही वापर करून वर्तुळ पूर्ण करावे.
  • सोयाबीन – हरबरा ही पीकपद्धती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर मानली जाते.
  • त्याखालोखाल बाजरी + तूर (२:२) ही आंतरपीक पद्धत उत्तम आहे. मात्र, या पद्धतीत संवेदनशील अवस्थेत पाणी देण्याची सोय करावी.

इतर महत्वाचे मुद्दे असे :

Advertisement
  • जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी सोयाबीन पिकावर आधारित पद्धती सर्वाधिक उत्तम मानली जाते.
  • एकाच शेतात वर्षानुवर्षे तेच ते पिक घेतल्याने काही काळाने त्या जमिनीत अन्नद्रव्यांची कमतरता दिसते.
  • शेतीमध्ये वर्षभर मुबलक पाण्याची सोय असले तरच फळबाग लागवडीचा मार्ग स्वीकारावा.
  • आपल्या भागातील उपलब्ध शेतमालाची बाजारपेठ लक्षात घेऊन किंवा बाजाराची गरज लक्षात घेऊन पिकांचे नियोजन करावे.
  • आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शेती हा जुगार नाही. त्याद्वारे आपल्याला कुटुंब चालवायचे असते. त्यामुळे शेतीला अभ्यासाची आणि नियोजनाची जोड द्या.

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply