Take a fresh look at your lifestyle.

पंचामृत बनवताना ‘ही’ घ्यावी काळजी; पहा याचे कोणते आहेत आरोग्यदायी फायदे

पंचामृत असे म्हटले तरी आपल्याला पूजाविधी आठवतो. पंचामृत म्हणजे पाच प्रकारच्या अमृताचे मिश्रण. वास्तुशांती, सत्यनारायण या पूजेमध्ये असे पंचामृत असयायलाच पाहिजे असा प्रघात आहे. या पंचामृतालाच चरणामृत असेही म्हटले जाते. पूजेदरम्यान याचा नैवद्य देवाला दाखवून मग प्रसाद म्हणून सर्वांना दिला जातो.

Advertisement

हे बनवण्यासाठीचे साहित्य :

पंचामृत दूध, दही, मध, साखर आणि तूप या 5 घटकाचे आरोग्यदायी मिश्रण आहे. यासाठी फ़क़्त माती, स्टील किंवा काचेचे स्वच्छ भांड घ्यावे. वरील 5 साहित्य चांगले मिक्स करून नंतर त्यात तुळशीच पान टाका. गाजजेनुसार आपण त्यात सुकामेवाही घालू शकता.

Advertisement

बनवताना घेण्याची काळजी :

Advertisement
 1. ताजे आणि नुकतेच बनवलेले पंचामृतच प्यावे. कारण याची शेल्फ लाईफ खूप जास्त नसते.
 2. पंचामृतात दही काही काळाने आंबट झाल्यावर वास बदलतो. त्यामुळे दोनेक तासात हे संपवून टाकावे.
 3. आयुर्वेदानुसार पंचामृत बनवताना तूप आणि मधाच प्रमाण सम असणार नाही याचीही काळजी घ्यावी.
 4. पंचामृताच्या अतिरिक्त फायद्यांसाठी ते चांदीच्या वाडग्यात बनवल्यास चांगले.
 5. पंचामृत फक्त प्रसाद नाही, तर दैनंदिन आहारात समाविष्ट करूनही याचे फायदे मिळू शकतात.

पंचामृताचे आरोग्यदायी फायदे :

Advertisement
 1. हे केसांसाठी पोषक आहे. सप्त धातूचे पोषण मिळून मुळे केस रोगी आणि चमकदारहोण्यासह वेगाने वाढण्यासही मदत होते.
  पंचामृताचे सेवन केल्यास बुद्धी तल्लख होते आणि स्मरणशक्तीही वाढते.
 2. गर्भावस्थेदरम्यान सेवन केल्यास मुलाच्या मस्तिष्क विकासास चालना मिळते.
 3. याच्या सेवनाने तुमची त्वचा निरोगी राहते आणि स्कीन सेल्सच्या विकासाला मदत मिळून त्वचेवर आपोआपच ग्लो येतो.
 4. हे शरीरातील पित्ताला संतुलित ठेवते. हायपर एसिडीटी आणि पित्ताचे असंतुलन टाळता येते.
 5. पचनाचा त्रास असेल त्यांनी पंचामृताचे सेवन नक्की करावे.
 6. पंचामृतामध्ये सप्त धातू आढळतात जे आपल्या शरीराला पोषण देण्याची क्षमता राखतात.

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply