Take a fresh look at your lifestyle.

IMP INFO : जमीन खरेदी करताना ‘या’ बाबी तपासून घ्या.. अन्यथा होऊ शकते फसवणूक

महाराष्ट्रात शेतकरी नसलेल्या व्यक्तीस शेतजमीन कोणत्याही प्रकारे खरेदी करता येत नाही. शेतजमिनीचे हस्तांतरण, खरेदी, बक्षीसपत्र, देणगी, अदलाबदल, भाडेपट्टा वा अन्यप्रकारे शेतकरी नसलेली व्यक्ती स्वत:साठी जमीन विकत घेऊ शकत नाही. मात्र धरण वा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याची पूर्ण शेतजमीन जर शासनाकडून संपादित झाली आसेल व भू संपादनाचा भक्कम पुरावा असेल तर अशी व्यक्ती शेतजमीन विकत घेऊ शकतो. जिल्हाधिकारी यांनी शहराच्या हद्दीत आलेल्या शेतजमिनीबाबत कुळकायदा ६३ व ८८ (१)(ब) अन्वये अधिसूचना प्रसिद्ध केली असेल तर अशी जमीन शेतकरी नसलेली व्यक्ती विकत घेऊ शकतो.

शेत जमिनीची खरेदी करताना खालील बाबी तपासून पाहाव्यात :

१) जमिनीचा सातबारा – ज्या गावातील जमीन खरेदी करायची आहे, तेथील तलाठ्याकडून जमिनीचा नवीन सातबारा उतारा काढून घ्यावा. फेरफार व आठ अ तपासून पाहा. सातबारा पहाताना वर्ग १ नोंद असली तर ती जमीन विक्री करणाऱ्याची स्वतःच्या मालकी वहिवाटीची असून सदर जमीन खरेदी करण्यास विशेष अडचण येत नाही. परंतु नियंत्रित सत्ता प्रकार किंवा वर्ग-२ अशी नोंद असेल तर सदर जमीन कुळ वहिवाटीमार्फत मिळालेली किंवा शासकीय लाभाची असते. वर्ग दोनची जमीन खरेदी करन्यात अनेक अडचणी असतात. किंबहुना अश्या जमिनी खरेदी करताना काही परवानग्या घ्याव्या लागतात. प्रांताधिकाऱ्यांची परवानगी मिळाल्यानंतरच अशी जमीन खरेदी करावी.

२) जमिनीपर्यंतचा रस्ता – जमीन बिनशेती असल्यास नकाशामध्ये रस्ता दाखविलेला असतो. परंतु जमीन बिनशेती नसल्यास संबंधित रस्ता सार्वजनिक  वहिवाटीचा असल्याची खात्री करावी.

३) आरक्षीत जमिनी – संबंधित जमिनीवर शासनाने कोणत्याही करणासाठीचे आरक्षण टाकले नसल्याची खात्री करावी.

४) वहिवाटदार – सातबारा उताऱ्यावरील मुळ मालक व प्रत्यक्ष जमिनीचा वहिवाटदार वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे जमीन मालक व वहिवाटदार एकच असल्याची खात्री करावी.

५) सातबारा उताऱ्यावरील नावे – सातबारा उताऱ्यावरील नावे ही आपल्याशी व्यवहार करणाऱ्या व्यक्तीचीच आहे का ते पहावे. त्यावर मयत व्यक्ती किवा जुना मालक किंवा इतर वारसांची नावे असल्यास शक्यतो व्यवहार टाळावा.

६) कर्जप्रकरण, न्यायालयीन खटला, भाडेपट्टा – संबंधित जमिनीवर कोणतीही बॅंक किवा संस्था यांच्या कर्जाचा बोजा नसल्याची खात्री करावी. तसेच या जमिनीबाबत न्यायालयीन खटला चालू असल्यास वकिलाचा सल्ला घ्यावा.

७) जमिनीची हद्द – संबंधित जमिनीची हद्द नकाशाप्रमाणे मोजून व तपासून घ्यावी. या जमिनीच्या लगतच्या जमीन मालकांची हरकत नसल्याची खात्री करावी.

८) इतर अधिकारांची नोंद – सातबारा उताऱ्यावर इतर अधिकारामध्ये कोणाची नावे असतील किंवा बक्षीसपत्राने मिळालेली जमीन असेल तर खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी.

Advertisement

९) संपादित जमिनी – खरेदी करावयाच्या जमिनीमधून नियोजित महामार्ग, रेल्वे मार्ग, तलाव किंवा इतर नियोजित प्रकल्प नसल्याची खात्री करावी. त्याची  सातबारावर नोंद पहावी. तसेच जमिनीच्या बाजूने रस्ता, नदी, महामार्ग, असेल तर त्यापासूनचे योग्य अंतर सोडून जमीन असल्यास खरेदी करावी.

१०) खरेदीखत – दुय्यम निबंधक कार्यालयात आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून व शुल्क भरून खरेदीखत करावे. इंडेक्स २ ची एक प्रत तलाठी कार्यालयात जमा करून नोंदीसाठी अर्ज द्यावा. काही दिवसानंतर खरेदी केलेल्या जमिनीचा नकाशा व आपल्या नावे सातबारा झाल्याची खात्री करावी.

Advertisement

संपादन : संतोष शिंदे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply