Take a fresh look at your lifestyle.

कांदा व टॉमेटो खाण्याचे आहेत दुष्परिणामही; वाचा, आरोग्यासाठी महत्वाची माहिती

कोणत्याही वस्तूचे किंवा गोष्टीचे कार्य एका मात्रेत झाल्यास योग्य असते. जास्त झाले की तीच गोष्ट हानिकारक ठरू शकते. जसे की, शेतीला मापात पाणी असल्यास चालते. मात्र, जास्त पाणी असल्यास जमीन खारवट होणे आणि पिकाचे कुपोषणही होतेच की. त्याचा पद्धतीने कांदा व टॉमेटो (Side Effects Of Onion and tomato) खाण्याचे जसे फायदे आहेत. तसेच तोटेही आहेत. त्याबाबत आज आपण पाहूया.

Advertisement

कांदा खाण्याचे दुष्परिणाम :

Advertisement
  • पोटाच्या समस्या : कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिकरित्या फ्रुक्टोज आढळतात. जो पोटात गॅस वाढवण्याची समस्या निर्माण करू शकतो. जास्त प्रमाणात खाल्ल्यास अन्नाचे पचन होण्याची समस्या, उलट्या, अतिसार यासारख्या समस्या सुरू होतात.
  • छातीमध्ये जळजळ : कांद्यामध्ये पोटॅशियमची मात्रा जास्त असल्याने शरीराच्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीवर परिणाम होतो. जास्त कांदा खाल्ल्याने अनेकदा छातीत जळजळ होते.
  • गर्भवती महिलांना इजा : कांद्याचे जास्त सेवन गर्भवती महिला आणि स्तनपान करणार्‍या महिलांसाठी खूप हानिकारक असू शकते. जास्त कांदा खाल्ल्याने त्यांच्या छातीत जळजळ होणे, आंबट व करपट ढेकर येणे अशा समस्याही उद्भवतात.
  • रक्त पातळ होणे : कच्च्या कांद्यामध्ये व्हिटॅमिन के याचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे शरीरात कौमाडिन नावाच्या औषधाचे प्रमाण वाढून रक्त पातळ होते.
  • तोंडाची दुर्गंधी : कांद्याचे जास्त सेवन केल्याने तोंडाला वास येतो. कांद्याच्या काही प्रकारांमुळे तोंडाचे दुर्गंधी येत नाही, परंतु बहुतेक जातीच्या कांद्यामुळे तोंडाला दुर्गंधी येते.

टॉमेटो खाण्याचे दुष्परिणाम :

Advertisement
  • टोमॅटोचे अनेक घटक शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. परंतु जर ते जास्त प्रमाणात खाल्ले तर त्यामुळे शरीरालाही बरेच नुकसान होते.
  • पोटाशी संबंधित समस्या तज्ञांचे मत आहे की टोमॅटो खाल्ल्याने पचन व्यवस्थित होते. परंतु जर टोमॅटो जास्त प्रमाणात खाल्ले तर पोटाशी संबंधित अनेक समस्या येतात. जास्त टोमॅटो खाल्ले तर अतिसार, मळमळ यासारख्या समस्या सुरू होतात.
  • संसर्ग : टोमॅटोमध्ये आम्ल जास्त असते. अशावेळी जास्त प्रमाणात हे खाल्ल्यास मूत्राशयात जळजळ होते. जर आपण आधीच मूत्राशयातील संसर्गाने ग्रस्त असल्यास टोमॅटोचे जास्त सेवन करू नये.
  • टोमॅटो खाल्ल्याने तोंड व घशात जळजळ होते. तसेच काही लोकांना चेहर्‍यावर पुरळ, त्वचेवर पुरळ, खाज सुटणे आणि सूज देखील येऊ शकते. ही अॅलर्जी असू शकते.

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply