Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. बनवला चक्क जिवंत रोबोट; पहा संशोधकांनी कुठे केली ‘ही’ किमया

लंडन :

Advertisement

संशोधक म्हाणजे कल्पनेला सत्यात उतरवणारे अवलिया. आपण अनेकदा इंग्रजी किंवा हिंदी सिनेमात जिवंत प्राणी किंवा माणसांचे रोबोट बनवल्याचे आणि त्यांनी चांगल्या-वाईट गोष्टी केल्याचे पाहतो. त्याच धर्तीवर अशी कल्पना सत्यात उतरवण्याचा यशस्वी प्रयत्न ब्रिटीश वैज्ञानिकांनी केला आहे.

Advertisement

ईंग्लंडमधील वैज्ञानिकांनी दावा केला आहे की, त्यांनी ‘जिवंत रोबोट’ तयार करण्यात यश मिळवले आहे. हा रोबोट स्वत:चे अवयवही आपल्या पद्धतीने बदलू शकतो. त्याची मेमरी अर्थात स्मरणशक्तीही उत्तम आहे. हा रोबोट ‘झेनोबॉट्स’ (Xenobots) या जैविक रोबोटची अद्ययावत आवृत्ती आहे. Xenobots चे मागील वर्षी अनावरण करण्यात आले होते.

Advertisement

टर्मिनेटर हा इंग्रजी सिनेमा पाहिला आहे ना? त्यात ज्या पद्धतीने मानवी रोबोट आपण पाहतो. त्याचा पद्धतीने भविष्यात याच संशोधनाच्या आधारे ह्युमन रोबोट वास्तवात दिसायला लागले तर आश्चर्य वाटायला नको, असा हा प्रयत्न आहे.

Advertisement

हा जिवंत रोबोट टूफट्स आणि व्हर्माँट या विद्यापीठामधील बेडकाच्या पेशींमधून तयार केला आहे. हा छोटा रोबोट एकाचवेळी बर्‍याच गोष्टी करू शकतो. यात स्वतःहून फिरणे आणि काही गोष्टी अंमलात आणणे समाविष्ट आहे. हा रोबोट त्याच्या साथीदार रोबोटसह एकत्र सैन्यासारखे कोणतेही कार्य करू शकतो. या नवीन रोबोटमध्ये बर्‍याच नवीन गोष्टी जोडल्या गेल्या आहेत. हा रोबोट कित्येक एकल पेशी एकत्र करून स्वत:चे शरीर बनवू शकतो. हे रोबोट पोहण्यासही सक्षम आहेत.

Loading...
Advertisement

या रोबोटची स्मरणशक्ती खूप चांगली आहे. सभोवतालच्या घटना तो लक्षात ठेवू शकतात. हे रोबोट पूर्वीच्या आवृत्तीपेक्षा वेगवान आणि कार्यक्षम आहेत. एवढेच नव्हे तर त्याचे आयुष्यही मोठे आहे. संशोधकांनी असे म्हटले आहे की, ते या रोबोटला अधिक अपग्रेड करू शकतात. जेणेकरून त्यामध्ये इतर क्षमता जोडल्या जाऊ शकतात.

Advertisement

या रोबोट्सचा उपयोग वातावरण सुधारण्यासाठी व आरोग्यामध्ये काही सुधारणा करण्यासाठी करता येतो असे संशोधकांनी म्हटले आहे. मानवांप्रमाणेच बेडूक हे पेशीद्वारे शरीर कसे बनवतात आणि एक यंत्रणा म्हणून कार्य कसे करतात हे देखील या रोबोट्सद्वारे शोधले जाऊ शकते. विज्ञान रोबोटिक्स या जर्नलमध्ये या रोबोट्सबद्दल संशोधन प्रकाशित केले गेले आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply