Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आयपीएल २०२१ : पहा हरभजन सिंग का म्हणालाय ‘मी माझ्या मर्जीचा मालक..!’

मुंबई :

Advertisement

भारतीय संघाचा ऑफस्पिनर हरभजन सिंग बऱ्याच दिवसांपासून राष्ट्रीय संघातून बाहेर असून त्याच्याबरोबर कारकीर्दीला सुरुवात करणारे बहुतेक खेळाडू निवृत्त झाले आहेत, पण हरभजन अजूनपर्यंत खेळत आहे. तो सेवानिवृत्ती कधी घेईल असा प्रश्नही अनेकांना पडतो. हा प्रश्न विचारणाऱ्यांना आता हरभजनने उत्तरं दिली आहेत. त्याने म्हटले आहे की, मी माझ्या मर्जीचा मालक आहे, जोपर्यंत खेळायचंय तोपर्यंत खेळेल.

Advertisement

९ एप्रिलपासून आयपीएलमध्ये हरभजन पुन्हा एकदा मैदानावर खेळताना दिसणार आहे. यंदा इंडियन प्रीमियर लीगमध्ये हरभजन कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळेल. हरभजनने म्हटले आहे की, बरेच लोक तो का खेळत आहेत असे म्हणतात. त्याला उत्तर देताना हरभजनने म्हटले आहे की, मला आता कुणालाही सिद्ध करण्याची गरज नाही. चांगला खेळ दर्शविणे आणि मैदानावरील खेळाचा आनंद घेणे असा माझा मानस आहे. क्रिकेट खेळल्यानंतर मला अजूनही समाधान मिळते, असे तो म्हणाला.

Advertisement

हरभजनने १९९८ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि आता त्याच्या नावावर ७०० हून अधिक आंतरराष्ट्रीय विकेट आहेत. तो म्हणाला की यशस्वी होण्यासाठी काय करावे लागते याची मला कल्पना आहे. मी आता २० वर्षांचा नाही आणि मी पूर्वीच्या सवयीप्रमाणे सराव करणार नाही. होय, मी ४० वर्षांचा आहे आणि मला माहित आहे की मी अद्याप तंदुरुस्त आहे आणि या पातळीवर यशस्वी होण्यासाठी मला जे करावे लागेल ते निश्चितपणे करेन.

Loading...
Advertisement

संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement

कृषीरंग | शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील न्यूज अपडेट वाचण्यासाठी https://t.me/krushirang चॅनलमध्ये सहभागी व्हा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply