Take a fresh look at your lifestyle.

पोल्ट्री फार्मिग : पावसात ‘ही’ घ्या काळजी; नाहीतर मरतुक वाढण्यासह होतील ‘हे’ दुष्परिणाम

कोंबड्या पाळणे हा काही येरागबाळ्याचा धंदा नाही. तिथे जातीने (काळजीपूर्वक) लक्ष देणाऱ्यांची गरज असते. कोणत्याही ऋतूत वेगवेगळ्या हवामान व आव्हानांचा अंदाज घेऊन कुक्कुटपालन करावे लागते. आज आपण यामध्ये अवकाळी पाऊस किंवा पावसाळ्यात कोणती काळजी घ्यावी हे पाहणार आहोत.

Advertisement

पावसाळ्यात पाणीच पाणी चोहीकडे असते अशावेळी पावसाचे पाणी किंवा सांडपाणी यांच्यामुळे पाण्यात रोगजंतू वाढतात. तसेच अशावेळी पाणीही क्षारमय असते. असे पाणी पिण्यासाठी आणि आरोग्यासाठी दुषित असते. त्या पाण्याच्या पिण्याने कोंबड्यांचे आरोग्य बिघडते. पोटातील त्रासासह त्यामुळे वजनाची वाढ मंदावते. नव्हे, त्रास जास्त राहिल्यास कोंबड्यांचे वजन कमी होते. अंडी देणाऱ्या कोंबड्यांमध्ये अंडी कमी मिळण्यासह मरतुकीचे प्रमाणही वाढते.

Advertisement

आजारी पडल्यावर ज्या पद्धतीने माणसामध्ये तणाव वाढतो. त्याच पद्धतीने कोंबड्याही तणावग्रस्त होतात. हे टाळण्यासाठी तज्ञांच्या सल्ल्याने योग्य औषधोपचार करावेत. पिण्याचे पाणी ३५ टक्के प्रवाही ब्लिचिंग पावडर टाकून वेळोवेळी निर्जंतुक करावे. पावसाळ्यात शेडमध्ये पावसाचे पाणी व सपके येणार नाहीत याची काळजी घ्यावी. उन्हाळ्यात त्याचे नियोजन करून ठेवावे. ऐनवेळी काही समस्या आल्यास तातडीने कार्यवाही करावी. थोडी हलगर्जीही अनेकदा मोठ्या तोट्यास कारणीभूत असू शकते.

Advertisement

खाद्य पाणी पडून किंवा अर्द्रतेने खराब होणार नाही याची काळजी घ्यावी. कारण, यामुळे अल्फाटॉक्सिनची विषबाधा झाल्यास असे खाद्य खाल्लेल्या कोंबड्यांची रोगप्रतिकार शक्ती (इम्युनिटी पॉवर) कमी होते. पावसाळ्यात शेडमध्ये खेळती हवा राहील आणि आर्द्रता वाढणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. तूस वेळोवेळी हलवावे. गरज वाटल्यास ते तातडीने बदलण्याची सोय करावी. अमोनिया वायूचे प्रमाणात नियंत्रित ठेवण्यासाठी विशेष लक्ष द्यावे. शेडच्या बाहेर डास व माश्या वाढणार नाहीत यासाठीचा बंदोबस्त करावा.

Advertisement

पावसाळ्यात रोगराई लवकर पसरते. जसे मानव ओ इतर प्राण्यांचे आहे तसेच पक्ष्यांमध्येही पावसाळ्यात रोगराई वाढून मारातून व आजाराने वजन कमी होण्याची टक्केवारी वाढणार नाही याकडे लक्ष द्यावे. जीवनसत्व आणि इतर आवश्यक औषधांचा साठा ठेवावा. गरज वाटल्यास तातडीने पशुवैद्यकीय तज्ञांना बोलावून घ्यावे.

Advertisement

संपादन व लेखन : सचिन मोहन चोभे

Advertisement

(क्रमशः)

Advertisement

वाचक बंधू-भगिनींनो, आपण ‘कृषीरंग’वर दररोज कुक्कुटपालन अर्थात पोल्ट्री फार्मिंग (Poultry Farming) या विषयावरील माहितीची मालिका प्रसिद्ध करणार आहोत. यामध्ये महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीसह जगभरातील पोल्ट्री फार्मिंग ट्रेंड आणि संशोधन याबाबतची माहिती आपण घेणार आहोत. सध्या या व्यवसायाला ‘अच्छे दिन’ आल्याच्या बातम्या माध्यमांतून येतात. अशावेळी या व्यवसायाचे वास्तव आणि व्यावहारिक भान देण्याचा हा प्रयत्न आहे. आपणास कोणत्याही सूचना व मार्गदर्शन करावेसे वाटल्यास krushirang@gmail.com या इमेलद्वारे आपण आम्हाला संपर्क करू शकता. तसेच नियमित बातम्यांचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय न्यूज अपडेट आणि कृषी-ग्रामीण विकासाची माहिती पाहण्यासाठी आमचे www.facebook.com/Krushirang (कृषीरंग) हे फेसबुक पेज लाईक व फॉलो करा. ही माहिती आवडल्यास इतर शेतकऱ्यांना माहितीसाठी शेअर करा. @टीम कृषीरंग

Advertisement

Advertisement

Leave a Reply