Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

म्हणून कांद्याला परदेशातून मागणी वाढली; ‘एवढा’ कांदा होऊ शकतो निर्यात

मुंबई :

Advertisement

सध्या कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली असल्याचे दिसून येत आहे. दिवसेंदिवस कांद्याचे दर कमी होताना दिसत आहे. नवी दिल्लीमध्ये सोमवारी कांद्यांचे दर 7.50 रुपये ते 22.50 रुपयांच्या दरम्यान होते. महाराष्ट्रात कांद्याचा दर 13 ते 14 रुपयांपर्यंत होता.

Advertisement

भारताला गेल्यावर्षी कांदा परदेशातून आयात करावा लागला होता. यंदा हे चित्र बदललं असून भारताकडून शेजारी देशांना कांदा निर्यात  केला जात आहे. देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे दर कमी झाले आहेत. कांदा व्यापाऱ्यांच्या अंदाजानुसार दोन लाख टन कांदा निर्यात केला जाऊ शकतो. 

Advertisement

महिनाभरात कांद्याचे दर निम्म्यावर आल्याचं सांगितलं आहे. कांद्याचे दर घटल्यानं निर्यात वाढली असल्याची माहिती आझादपूर मार्केट पोटॅटो ऑनियन मर्चंट असोसिएशनचे महासचिव राजेंद्र शर्मा यांनी दिली आहे.

Advertisement

 2020 मध्ये भारतानं 65, 546 टन कांद्याची आयात केली होती. भारत बांग्लादेश, श्रीलंका यासह इतर शेजारी देशांना कांदा निर्यात करतो. नाफेड महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेश या राज्यांसह नव्यानं तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा राज्यांकडून कांदा खरेदी करणार आहे.  

Loading...
Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply