Take a fresh look at your lifestyle.

‘असे’ वाढवा कोंबड्यांमधील अंडी उत्पादन; वाचा, अंडी व्यवसायासाठी महत्वाची माहिती

पोल्ट्री व्यवसायासह अंडी उत्पादन हाही एक मोठा व्यवसाय बनला आहे. अंडी देणाऱ्या कोंबड्यांच्या व्यवस्थापनात आता विविध नवनवीन तंत्रज्ञान आले आहे. ज्यामुळे अंडी उत्पादनात वाढ होत आहे. वातावरणातील बदलामुळे कोंबड्यांच्या गर्भाशयामध्ये विविध बदल होतात. त्याचा थेट परिणाम अंडी उत्पादनावर होतो.

Advertisement

थंडीच्या काळात कोंबड्यांच्या अंडी उत्पादनामध्ये चांगलीच कमी झालेली असते. म्हणून आज आम्ही आपल्याला कोंबड्यांमधील अंडी उत्पादन औषधी वनस्पतींचा उपयोग करून कसे वाढवावे याविषयी माहिती देणार आहोत. योग्य प्रकारे उपयोग केल्यास कमी काळात जास्तीत जास्त अंडी उत्पादन मिळण्याकरिता औषधी वनस्पतींचा उपयोग करावा.

Advertisement
  1. जनावरांमध्ये दूध उत्पादन वाढविणारी आणि कोंबड्यांमध्ये अंडी उत्पादन वाढविणारी जीवंती ही वनस्पती अत्यंत गुणकारी आहे.
  2. शोभेसाठी कुंडीत लावली जाणारी शतावरी या वनस्पतीचे मूळ हे औषधी आहे. या वनस्पतीचे मुळाची पावडर बनवून ती कोंबड्यांना खाद्यात पुरविली जाते.
  3. मेथी या वनस्पतीची बी अंडी उत्पादन वाढविण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे.

हे प्रमाण घ्या लक्षात :-

Advertisement

1) शतावरी – 45 ग्रॅम 
2) जिवंती – 45 ग्रॅम 
3) मेथी – 10 ग्रॅम   

Advertisement

अशी आहे प्रोसेस :-

Advertisement
  1. या सर्व वनस्पती एकत्र कराव्या.
  2. या सर्व वनस्पती बारीक कराव्यात.
  3. 10 ग्रॅम प्रति 100 पक्षी या मात्रेत दररोज पक्ष्यांच्या खाद्यातून द्यावी. 
  4. हीच एकत्रित औषधी पक्षाच्या वयाच्या 100 आठवड्यांपासून 10 ग्रॅम प्रति 500 पक्षी या मात्रेत नियमित दिल्यास अशा पक्ष्यांपासून जास्तीत जास्त अंडी उत्पादन मिळते.

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply