Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ भाजप नेत्याचा महिलेसोबत अश्लील डान्स; पहा, व्हायरल झालेला व्हीडीओ

दिल्ली :

Advertisement

महापराक्रमी अशी प्रतिमा असलेल्या भाजप पक्षातील पराक्रमी नेत्यांचे विविध कारनामे अनेकदा समोर येत असतात. आताही एका अशाच भाजपच्या नेत्याचा कारनामा समोर आला आहे. राजस्थानमधील प्रतापगडच्या एका भाजप नेत्याचा एका महिलेसोबत अश्लील डान्स करतानाचा व्हीडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

Advertisement

सदर भाजप नेता भाजपाच्या त्याठिकाणच्या विभागाील ग्रामीण मंडळाचा पदाधिकारी आहे. कैलास गुर्जर असे या भाजप नेत्याचे नाव असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ व्हायरलझाला असल्याचे सांगितले जात आहे. या व्हायरल व्हिडिओत कैलास गुर्जर यांनी महिला डान्सरबरोबर अश्लील प्रकारचे नृत्य आणि क्रिया केलेल्या आहेत.    

Advertisement

प्रतापगढ नगर परिषदेच्या निवडणुकीआधी हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने तेथील राजकीय वातावरणात संताप पसरला आहे. याप्रकरणी बोलताना गुर्जर यांनी म्हटले आहे की, मी माझ्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेलो होतो. तिथे हा प्रकार घडला. ते माझं वैयक्तिक आयुष्य आहे. त्या कार्यक्रमाचा भाजपाशी काहीही संबंध नाही. काही लोक मुद्दाम त्या व्हिडीओचा वापर करून माझी प्रतिमा मलीन करत आहेत.

Advertisement

दरम्यान ‘या प्रकरणाची चौकशी केली जात असून प्रकरण नक्की काय आहे ते उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी कारवाई केली जाईल’, अशी भूमिका भाजपाचे राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया यांनी मांडली आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply