Take a fresh look at your lifestyle.

अरे..रे.. त्या गावामध्ये झाला 10 मोरांचा मृत्यू; बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर तातडीने कार्यवाहीची मागणी

बीड : 

Advertisement

देशभरात बर्ड फ्लू या आजाराची लागण झाल्याने पक्षी आणि कोंबड्यांचा मृत्यू होत आहे. अशावेळी मग आणखी एक झटका देणारा प्रकार बीड जिल्ह्यात सुरू झालेला आहे. इथे मोरांचा मृत्यू होत असल्याचे लक्षात आलेले आहे.

Advertisement

मागील दोन-तीन दिवसापासून अशा पद्धतीने मोरांच्या मृत्यूचे सत्र सुरू असून ते थांबता थांबत नसल्याचे वन विभागाच्या अधिकारी व स्थानिकांनी सांगितले आहे. शुक्रवारी सकाळी शिरूर कासार तालुक्यातील लोणी शिवारात पाच मोर मृतावस्थेत आढळून आले होते.

Advertisement

शनिवारी दुपारी पुन्हा ज्वारीच्या शेतात 5 मोर मृतावस्थेत आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण आहे. सलग दोन दिवस मोरांचे मृत्यू होत असल्याने ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे. असे असताना देखील बीड जिल्हा प्रशासन मोरांचे मृत्यू रोखण्यासाठी ठोस पावले उचलत नसल्याचा आरोप परिसरातील ग्रामस्थांनी केला आहे.

Advertisement

बीड जिल्ह्यातील पाटोदा -शिरूर कासार तालुक्‍यात लोणी-वारणी शिवारात मोरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जवळच आशिया खंडातील सर्वात मोठे मयूर अभयारण्य नायगाव आहे. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात मोरांचा वावर असतो. मात्र मागील काही दिवसापासून बीड जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’ची साथ असल्याने अनेक ठिकाणी पक्षांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातच राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांच्या मृत्यूने स्थानिकांनी हालहाल व्यक्त केली आहे. प्रशासनाने या सुंदर पक्ष्याचे जीव वाचवण्याची मागणी होत आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply