दिल्ली : जगभरात कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे. सरासरी चार महिन्यांत कोरोना विषाणूचे नवीन प्रकार समोर येत आहेत. हे पाहता, संयुक्त राष्ट्र महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी इशारा दिला आहे, की कोरोना साथरोग अद्याप संपलेला नाही. आशिया खंडात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे. गुटेरेस यांनी सरकार आणि फार्मा कंपन्यांना प्रत्येकासाठी सर्वत्र लस उपलब्ध करण्यासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन केले. GAVI COVAX Advance Market Commitment Summit 2022 साठी, गुटेरेस यांनी एक संदेश जारी केला. त्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, कोरोनाची साथ संपलेली नाही.
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस म्हणाले, की आम्ही दररोज 15 लाख नवीन प्रकरणे पाहत आहोत. आशिया खंडात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. संपूर्ण युरोपमध्ये एक नवीन लाट पसरत आहे. ते म्हणाले, की काही देश साथीच्या रोगाच्या सुरुवातीपासून सर्वाधिक मृत्यू दर नोंदवत आहेत.
कोरोना विषाणूचे ओमिक्रॉन प्रकार हे दर्शविते, की कोविड-19 किती वेगाने पसरू शकतो. विशेषत: जास्त लसीकरण कव्हरेज नसताना. त्यांनी दु:ख व्यक्त केले, की जगात एक तृतीयांश लोकांना अद्याप लसीकरण करणे बाकी असताना दुसरीकडे काही श्रीमंत देश त्यांच्या दुसऱ्या बूस्टर डोसची तयारी करत आहेत. हे आपल्या असमान जगाचे एक क्रूर उदाहरण आहे. यामुळे कोरोनाचे आणखी नवे व्हेरिएंट येण्यास अनुकूल वातावरण तयार करण्यासारखेच आहे. ज्यामुळे अधिक मृत्यू आणि आर्थिक संकटे अनेक पटींनी वाढतील. नवीन प्रकार कधी, का, कुठे असे प्रश्न विचारणे योग्य होणार नाही, असे ते म्हणाले. ते म्हणाले, की या वर्षाच्या मध्यापर्यंत प्रत्येक देशात 70 टक्के लसीकरण कव्हरेज गाठण्याच्या आमच्या लक्ष्यापासून आम्ही खूप दूर आहोत.