Ukraine Russia War : मागील दोन वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध (Ukraine Russia War) अजूनही संपलेले नाही. या युद्धातच आता युक्रेनने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आपले सैन्य भरतीचे वय 27 वरून 25 पर्यंत कमी केले आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी सही केल्याच्या एक दिवसानंतर नवीन कायदा लागू झाला. युक्रेनच्या संसदेने मागील वर्षी या विधेयकाला मंजुरी दिली होती. मात्र हा कायदा लागू करण्यासाठी युक्रेन सरकारला इतका कालावधी का लागला याचे स्पष्ट उत्तर अजून मिळालेले नाही. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष यांनीही याबाबत अधिक माहिती दिलेली नाही. देशाला किती नवीन सैनिक मिळण्याची गरज आहे किंवा कोणत्या युनिटसाठी सैनिकांची भरती केली जाईल याचे उत्तर अधिकाऱ्यांनीही दिलेले नाही.
युक्रेनमध्ये अनेक महिन्यांपासून सैन्यात सैनिकांची वाढती कमतरता आणि दारूगोळ्याची कमतरता जाणवत आहे. यामुळे सैन्यात भरती हा एक महत्त्वाचा विषय बनला आहे. रशियाला युद्धभूमीत (Russia) टक्कर देण्यासाठी पुरेशा सैनिकांची आवश्यकता युक्रेनला आहे. रशियाच्या स्वतःच्या मनुष्यबळाच्या आणि नियोजनाच्या समस्यांमुळे आतापर्यंत त्याचा पुरेपूर फायदा घेण्यापासून रोखले गेले होते.
Ukraine Russia War
लष्करी विश्लेषकांचे असे म्हणणे आहे की रशियन बाजूच्या सैनिकांप्रमाणेच युक्रेन सैनिकांचे सरासरी वय 40 च्या आसपास आहे. काही युक्रेनियन लोकांना काळजी वाटते की तरुण प्रौढांना कर्मचाऱ्यांतून बाहेर काढल्याने युद्धग्रस्त अर्थव्यवस्थेचे आणखी नुकसान होईल. परंतु आता ही समस्या गंभीर झाली आहे. कारण रशिया आणि युक्रेन या (Ukraine) दोन्ही देशांच्या सैन्याने आक्रमक धोरण स्वीकारले आहे.
मागील वर्षातील डिसेंबर महिन्यात झेलेन्स्की म्हणाले होते की देशाच्या सैन्याला आणखी पाच लाख सैनिक जमा करायचे आहेत. परंतु याबाबत निर्णय घेण्याआधी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तपशील देण्यास सांगितल्याचे राष्ट्राध्यक्ष झेलन्स्की म्हणाले होते.
दरम्यान, रशिया आणि युक्रेन यांच्या सीमा एकमेकाला लागून आहेत. त्यामुळे युक्रेनला रशियाकडून नेहमीच धोका वाटत होता. याच कारणामुळे युक्रेनला नाटो संघटनेत (NATO) सहभागी व्हायचे होते. परंतु, रशियाचा याला तीव्र विरोध होता. यासाठीच युक्रेनने काही निर्णय घेण्याआधीच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या आदेशानंतर रशियन सैन्याने 24 फेब्रुवारी 2022 रोजी युक्रेनवर हल्ले करण्यास सुरुवात केली.
Ukraine Russia War | विनाशकारी युद्धाची दोन वर्षे; उद्धवस्त शहरे, हजारोंचा मृत्यू, अन् लाखो लोक बेघर
Ukraine Russia War
तब्बल 65 लाख लोक विस्थापित; घरे इमारती उद्धवस्त
या युद्धामुळे दोन वर्षात मोठा विध्वंस घडला आहे. अनेक शहरांमध्ये घरे आणि इमारती उद्धवस्त झाल्या आहेत. यु्क्रेनला याचा जास्त फटका बसला आहे. युद्धाच्या सुरुवातीपासूनच रशियाने युक्रेनवर क्षेपणास्त्रे, ड्रोन, बॉम्बद्वारे हल्ले केले. रशियाने युद्ध पुकारल्यामुळे आतापर्यंत 1.4 कोटी लोकांनी युक्रेन सोडले आहे. तर सुमारे 37 लाख लोक विस्थापित झाले आहेत. त्यांना अन्य देशात आश्रय घेणे भाग पडले आहे. यातील काही लोक पुन्हा देशात परतले आहेत. युक्रेन सोडलेले जवळपास 65 लाख लोक अजूनही अन्य देशात शरणार्थी म्हणून राहत आहेत.
ज्यावेळी रशियाने यु्क्रेनवर हल्ला केला तेव्हा असे वाटत होते की काही दिवसांतच युद्ध संपेल. परंतु, या युद्धात युक्रेनच्या बाजूने अमेरिका, ब्रिटेन यांसह अन्य देश युरोपियन युनियनची ताकद होती. त्यामुळे रशियाला अजूनही युक्रेनचा पाडाव करता आलेला नाही. युक्रेनच्या सैन्याने अनेक ठिकाणांहून रशियाच्या सैन्याला हुसकावून लावले आहे.