Ukraine Russia War | विनाशकारी युद्धाची दोन वर्षे; उद्धवस्त शहरे, हजारोंचा मृत्यू, अन् लाखो लोक बेघर

Ukraine Russia War : रशिया आणि युक्रेन यांच्यातील विनाशकारी युद्धाला (Ukraine Russia War) आज दोन वर्षे पूर्ण झाली. या दोन वर्षांच्या काळात दोन्ही देशांत अतोनात नुकसान झाले. लाखो लोक विस्थापित झाले. हजारो लोक मृत्यूमुखी पडले. शाळा, दवाखान्यांसह अन्य पायाभूत सुविधा उद्धवस्त झाल्या. हे युद्ध इतक्या दिवस सुरू राहिल याचा अंदाज कुणालाच नव्हता. दुसऱ्या महायुद्धानंतरचे (Ukraine War) हे सर्वात मोठे युद्ध ठरले आहे. या युद्धात रशियाच्या (Russia) तुलनेत युक्रेनचे जास्त (Ukraine) नुकसान झाले आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्या सीमा एकमेकाला लागून आहेत. त्यामुळे युक्रेनला रशियाकडून नेहमीच धोका वाटत होता. याच कारणामुळे युक्रेनला नाटो संघटनेत (NATO) सहभागी व्हायचे होते. परंतु, रशियाचा याला तीव्र विरोध होता. यासाठीच युक्रेनने काही निर्णय घेण्याआधीच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या आदेशानंतर रशियन सैन्याने 24 फेब्रुवारी 2022 रोजी युक्रेनवर हल्ले करण्यास सुरुवात केली.

Russia Ukraine War : ‘युक्रेन’नंतर पुतिन यांचा नवा प्लॅन! आता ‘या’ देशावर कब्जा करण्याची तयारी?

Ukraine Russia War

ब्बल 65 लाख लोक विस्थापित; घरे इमारती उद्धवस्त 

या युद्धामुळे दोन वर्षात मोठा विध्वंस घडला आहे. अनेक शहरांमध्ये घरे आणि इमारती उद्धवस्त झाल्या आहेत. यु्क्रेनला याचा जास्त फटका बसला आहे. युद्धाच्या सुरुवातीपासूनच रशियाने युक्रेनवर क्षेपणास्त्रे, ड्रोन, बॉम्बद्वारे हल्ले केले. रशियाने युद्ध पुकारल्यामुळे आतापर्यंत 1.4 कोटी लोकांनी युक्रेन सोडले आहे. तर सुमारे 37 लाख लोक विस्थापित झाले आहेत. त्यांना अन्य देशात आश्रय घेणे भाग पडले आहे. यातील काही लोक पुन्हा देशात परतले आहेत. युक्रेन सोडलेले जवळपास 65 लाख लोक अजूनही अन्य देशात शरणार्थी म्हणून राहत आहेत.

Ukraine Russia War

ज्यावेळी रशियाने यु्क्रेनवर हल्ला केला तेव्हा असे वाटत होते की काही दिवसांतच युद्ध संपेल. परंतु, या युद्धात युक्रेनच्या बाजूने अमेरिका, ब्रिटेन यांसह अन्य देश युरोपियन युनियनची ताकद होती. त्यामुळे रशियाला अजूनही युक्रेनचा पाडाव करता आलेला नाही. युक्रेनच्या सैन्याने अनेक ठिकाणांहून रशियाच्या सैन्याला हुसकावून लावले आहे.

Pakistan News : सरकारचा नाही पत्ता पण, ‘उधारी’चा प्लॅन पक्का; पहा, काय घडतंय शेजारी

11 हजार लोकांचा मृत्यू, 11 हजार बेपत्ता 

युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत 11 हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर वीस हजारांपेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. 11 हजार लोक अजूनही बेपत्ता आहेत. मृत आणि जखमी युक्रेनियन सैनिकांची संख्या 3 लाख 60 हजार इतकी आहे. या युद्धात मरण पावलेल्या आणि जखमी झालेल्या रशियन सैनिकांची संख्याही 3 लाख 30 हजारांच्या आसपास आहे.

Leave a Comment