दिल्ली : युक्रेन आणि रशियन सैन्यामध्ये युद्ध सुरू होऊन 16 दिवस झाले आहेत. युक्रेनची राजधानी कीवमध्ये रशियन सैन्याने निर्णायक युद्ध सुरू केले आहे. युरोपियन युनियनच्या नेत्यांनी शुक्रवारी सांगितले की ते कीवसाठी लष्करी समर्थन वाढ करताना, युक्रेनवरील आक्रमणासाठी रशियाला शिक्षा करण्यासाठी आणखी निर्बंध टाकले जातील, असे म्हटले आहे. त्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही एक महत्वाचे वक्तव्य केले आहे.
बायडेन म्हणाले, की रशिया आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि जागतिक बँक यांसारख्या वित्तीय संस्थांकडून निधीची मागणी करणार नाही याची खात्री करण्यासाठी G7 नेते सहमत होतील. तसेच त्यांनी रशियावर नवीन निर्बंध लादण्याची घोषणा केली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे आक्रमक असून त्यांना या कृत्याची किंमत द्यावी लागेल, असे अमेरिकेचे बायडेन यांनी म्हटले आहे.
अमेरिका रशियाकडून मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा काढून घेईल, अशी घोषणा अमेरिकेच्या सभागृहाच्या अध्यक्षांनी आज पत्रकार परिषदेत केली. मे महिन्याच्या अखेरीस आम्ही 2027 पर्यंत रशियन गॅस, तेल आणि कोळशावरील आमचे अवलंबित्व संपुष्टात आणण्याचा प्रस्ताव सादर करू, असे युरोपीय आयोगाच्या अध्यक्षांनी म्हटले आहे.
दरम्यान, याआधी रशियाने नाटोवरच घणाघाती टीका केली होती. नाटोचा खरा प्लान काय आहे, हे सुद्धा उघड केले होते. नाटोचा खरा उद्देश आम्हाला रोखणे हा आहे, असे रशियाने म्हटले आहे. त्याचवेळी आम्ही नाटोला जोरदार प्रत्युत्तर देऊ, असा इशारा रशियन सरकारने दिला आहे. एका अहवालानुसार, रशियाने दावा केला आहे की, पूर्वेकडील भागात नाटो सैन्य जमा होत आहे. त्याचवेळी रशियाने नाटोच्या या हालचालीचे वर्णन चिथावणीखोर असल्याचे केले आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी स्पष्टपणे युक्रेन यापुढे नाटो सदस्यत्वाची मागणी करणार नाही, असे सांगितल्यानंतर रशियाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
Russia-Ukraine War : रशिया निर्बंधांमुळे होणार मोठे नुकसान; पहा, चीनने कुणाला दिलाय ‘हा’ इशारा..
Russia Ukraine War : रशिया विरोधात नवा प्लान; पहा, आता काय करणार युरोपातील देश..