दिल्ली : रशियाच्या आक्रमणापासून युक्रेनला शस्त्रास्त्रे आणि आर्थिक मदत स्वरूपात 12 अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त पैसे मिळाले आहे. गुरुवारी युक्रेनचे पंतप्रधानांनी ही माहिती दिली. यासाठी त्यांनी अमेरिकेसह सर्व युरोपीय देशांचे आभार मानले. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, वॉर्सा येथे स्वीडन आणि युरोपियन कमिशनच्या प्रमुख नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत युक्रेनच्या पंतप्रधानांनी युक्रेनला संपूर्ण युद्धात पाठिंबा दिल्याबद्दल सर्व देशांचे आभार मानले. 24 फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनवर हमला केला आणि दोन्ही देशांमधील लष्करी संघर्ष अजूनही सुरू आहे. रशियाच्या या कृतीमुळे संतप्त झालेल्या अमेरिकेसह सर्व पाश्चिमात्य देशांनी रशियावर आर्थिक बहिष्कार टाकत विविध निर्बंध लादले. त्याच वेळी या देशांनी युक्रेनला युद्धात रशिया विरोधात सामना करण्यासाठी शस्त्रे आणि आवश्यक आर्थिक मदत दिली.
त्याच वेळी, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटले आहे की, या युद्धामुळे देशाचे 600 अब्ज डॉलर्सहून अधिक नुकसान झाले आहे. शेकडो उद्योग उद्ध्वस्त झाले आणि जवळपास 2,500 किलोमीटर रस्ते आणि 300 पूल उद्ध्वस्त झाले. त्याच वेळी, युक्रेनच्या मित्र राष्ट्रांनी या नुकसानीची भरपाई करण्यासाठी युक्रेनला सतत मदत केली.
अमेरिकेने सांगितले, की यातील 20 अब्ज डॉलर्स युक्रेनच्या लष्करी मदतीसाठी आणि शेजारील देशांच्या संरक्षण यंत्रणा मजबूत करण्यासाठी, तर 8.5 अब्ज डॉलर राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या सरकारसाठी आणि 3 अब्ज डॉलर सामान्य जनतेसाठी. नागरिकांसाठी मानवतावादी मदत म्हणून दिले आहेत.
दरम्यान, रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाला बुधवारी 70 दिवस पूर्ण झाले. कीव स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (KSE) आणि युक्रेनच्या वित्त मंत्रालयाच्या अहवालानुसार, युद्धामुळे युक्रेनच्या अर्थव्यवस्थेला 564 ते 600 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ही रक्कम युक्रेनच्या वार्षिक जीडीपीपेक्षा चार पट जास्त आहे. म्हणजेच युक्रेनने 70 दिवसांच्या युद्धात चार वर्षांत जितके कमावले असेल तितके सगळे गमावले आहे.
70 दिवसांच्या युद्धात युक्रेनची सुमारे 92 अब्ज डॉलर्सची संपत्ती नष्ट झाली आहे. केएसईने आपल्या अहवालात हे मूल्यांकन केले आहे. अहवालानुसार, गेल्या एका आठवड्यात युक्रेनमधील युद्धामुळे एकूण 4.5 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. इतकेच नाही तर रशियन हमल्यात 90 हजार वाहने उद्ध्वस्त झाली आहेत, ज्यांची किंमत अंदाजे $1.3 अब्ज आहे.
बाब्बो.. फक्त 70 दिवसातच 4 वर्षांचे नुकसान; पहा, युद्धामुळे युक्रेनला कसा बसलाय फटका..