नवी दिल्ली : युक्रेनच्या मुद्द्यावरून रशिया आणि नाटो यांच्यातील तणाव वाढत आहे. या प्रकरणात वेगाने घडामोडी घडत आहे. संपूर्ण युरोपमध्ये हाय अलर्टसारखी परिस्थिती आहे. अर्थात हे संकट टाळण्यासाठी रशिया आणि अमेरिकेचे अधिकारी सातत्याने बैठका घेत आहेत, मात्र दुसरीकडे अमेरिकाही काही मोठी पावले उचलत आहे, त्यामुळे युद्धाची शक्यता वाढत आहे. अमेरिकेने युक्रेनमधून आपल्या काही राजनैतिक अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना माघार येण्यास सांगितले आहे.
अमेरिकी स्टेट डिपार्टमेंटने युक्रेनसाठी आधीच ‘लेव्हल 4’ अॅडव्हायजरी जारी केली आहे. ज्यामध्ये कोरोना विषाणूची साथ आणि ‘रशियाचा वाढता धोका’ लक्षात घेऊन अमेरिकन नागरिकांना युक्रेनमध्ये न जाण्यास सांगण्यात आले आहे. ज्या दिवशी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंक यांनी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांची भेट घेतली त्याच दिवशी नॉन-स्टाफ सदस्यांना परत बोलावण्याची योजना तयार करण्यात आली होती. सध्याचा तणाव कमी करण्यासाठी ही बैठक झाली होती.
अमेरिकेने युक्रेनला 90 टन मदत दिल्याच्या बातम्यांमुळे युद्धाची शक्यताही बळकट होत आहे. रशियाने सीमेवर मोठ्या प्रमाणात सैनिक तैनात केले आहेत. दरम्यान, अमेरिकेने युक्रेनला 90 टन मदत पाठवणे ही मोठी बाब आहे. याआधी अमेरिकेने युक्रेनला लष्करी मदत मंजूर केली होती. त्यानंतर ही पहिली खेप पाठवण्यात आली, जी युक्रेनमध्ये पोहोचली आहे. त्यात सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांच्या शस्त्रास्त्रांचाही समावेश आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी डिसेंबरमध्ये युक्रेनला 20 कोटी डॉलर सुरक्षा मदत पॅकेज मंजूर केले.
न्यूयॉर्क टाईम्समधील वृत्तानुसार, रशिया युक्रेनला अतिशय गुप्तपणे घेरण्याचा प्रयत्न करत आहे. 5 जानेवारी रोजी त्याने कीवमधील आपल्या दूतावासातून 18 लोकांना मॉस्कोला पाठवले. हे सर्व लोक मॉस्कोला पोहोचले. त्यानंतर पुढील काही दिवसांत आणखी 30 जणांना अशाच प्रकारे मॉस्कोला पाठवण्यात आले. युक्रेनमध्ये कीव व्यतिरिक्त रशियाचे दोन वाणिज्य दूतावास आहेत. त्यांना कधीही मॉस्कोला जाण्याचे आदेश दिले जाऊ शकतात, असे त्यांच्या कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले आहे.
अमेरिकन तज्ज्ञांच्या मते, रशियाने युक्रेनच्या सीमेवर 60 बटालियन तैनात केल्या आहेत. एकंदरीत रशियन सैनिकांची संख्या 77 हजारांवरून एक लाखावर पोहोचली आहे. मात्र, महिनाभरापूर्वी पेंटागॉनने ही संख्या एक लाख 75 हजार इतकी दिली होती. अमेरिकन गुप्तचरांना वाटते की रशियन सैन्य सीमा भागात बर्फ पूर्णपणे गोठण्याची वाट पाहत आहे. यामुळे सैनिक आणि तोफखाना हलविणे सोपे होईल.
अर्र.. युद्धाला तोंड फुटणार..! तब्बल 1 लाख सैन्य जमलेय सीमेवर