दिल्ली : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या काळात आता नाटोने मोठे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. नाटो सैनिक आणि त्यांचे सहकारी सोमवारपासून नॉर्वेमध्ये प्रशिक्षण सराव सुरू करतील. या सरावाचा मुख्य उद्देश नाटो देशांना स्वतःचे रक्षण करणे हा आहे. रशियाच्या बॉर्डरपासून थोड्या अंतरावर नॉर्वेजवळ हा सराव होणार आहे.
27 देशांतील सुमारे 30,000 सैनिक, 200 विमाने आणि 50 जहाजे या प्रशिक्षणात भाग घेतील, ही या वर्षातील नाटो सैन्याची सर्वात मोठी संख्या आहे. शुक्रवारी, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन म्हणाले की ते तिसरे महायुद्ध संपेपर्यंत नाटोचे रक्षण करतील, परंतु ते युक्रेनमध्ये रशिया विरोधात संघर्ष करुन युद्धात आधिक वाढ करण्याची जोखीम पत्करणार नाहीत. तसेच नो फ्लाय जोन स्थापन करण्यासही नकार देणार आहे. नॉर्वेचे संरक्षण मंत्र्यांनी एएफपी या वृत्तसंस्थेला सांगितले, की हे प्रशिक्षण एखाद्या शक्तिशाली देशाच्या आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी सदस्य देशांचे सहकार्य घेण्यास मदत करते. हे प्रशिक्षण1 एप्रिल रोजी संपेल.
विशेष म्हणजे, दुसरे महायुद्ध संपत असताना आणि अमेरिका-सोव्हिएत युनियन यांच्यातील शीतयुद्ध सुरू असताना 1949 मध्ये नाटोची स्थापना करण्यात आली. सुरुवातीला या संघटनेत 12 सदस्य देश होते, ज्यांची संख्या आता 30 झाली आहे. 1991 मध्ये सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यानंतर यापैकी अनेक देश नाटोमध्ये सामील झाले. NATO च्या चार्टरमध्ये 14 कलमे आहेत, त्यापैकी कलम 5 सर्वात महत्वाचे आहे. खरेतर, या नियमांतर्गत, नाटो हमी देतो की जर त्याच्या सदस्यांपैकी एकावर जरी हमला झाला तर या संघटनेतील सर्वच देशांवरील हा हमला मानला जाईल आणि नाटो प्रत्युत्तर देईल.
दरम्यान, रशिया आधीच नाटोवर संतापलेला आहे. रशियाने नाटोला अनेक वेळा धमक्याही दिल्या आहेत. नाटोच्या कारवाया रशियाच्या लक्षात आल्या आहेत. त्यामुळे या संघटनेच्या प्रत्येक हालचालीवर रशिया बारीक नजर ठेऊन असतो. आता या नाटोच्या या हालचालींची रशियाला माहिती नसेल असे होणार नाही. आधीच युद्धाचा धोका सातत्याने वाढत चालला आहे. कोणताही देश माघार घेण्यास तयार नाही. त्यातही अमेरिका, युरोपिय देश आणि रशियातील तणाव वाढत चालला आहे. त्यामुळे अमेरिका, युरोपिय देश आणि नाटोच्या या घडामोडींवर आता रशिया काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Russia Ukraine War : रशिया विरोधात नवा प्लान; पहा, आता काय करणार युरोपातील देश..