Ukraine Crisis : रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम (Russia Ukraine War Effect) इटलीसह युरोपातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवरही होत आहे. रशियाच्या कच्च्या तेलावर (Crude Oil) मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेल्या पूर्व युरोप, जर्मनी, इटली आणि तुर्कस्तानमधील लोकांसाठी वस्तू आधीच खर्चिक झाल्या आहेत. 20 वर्षांत प्रथमच डॉलरच्या तुलनेत युरो 12 टक्क्यांनी घसरला आहे. एक युरो एक डॉलरवर पोहोचला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्जा संकटाला जबाबदार धरले जात आहे. त्यामुळे युरोपीय देशांमध्ये आर्थिक मंदीचा धोका निर्माण झाला आहे.
कठोर हालचालीचा एक भाग म्हणून, नॉर्ड स्ट्रीम 1 पाइपलाइनच्या देखभालीचे कारण देत रशियाने अलीकडेच इटलीचा गॅस पुरवठा (Gas Supply) कमी केला. युरोपातील इतर देशांमध्येही परिस्थिती बिकट आहे. अन्नधान्याचे संकट आणि गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यातील कमतरतेमुळे ही समस्या समोर आली आहे. बिघडलेल्या आर्थिक आणि ऊर्जा संकटाच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी इटलीला (Italy) आपत्कालीन पावले उचलणे भाग पडले आहे.
Heart Attack Risk: ‘या’ तेलाच्या सेवनाने हृदयविकाराचा धोका होणार कमी; लवकर करा आहारात समावेश https://t.co/WAngbjkJG6
— Krushirang (@krushirang) July 13, 2022
युरोपमध्ये (Europe) चलनवाढ 8.6 आहे. 1991 नंतर प्रथमच जर्मनीची (Germany) व्यापार तूट आहे. याचे कारण तेलाच्या किमतीत झालेली तीव्र वाढ आणि पुरवठा साखळीतील अडचणींमुळे आयातीचा खर्च वाढला आहे. हंगेरियन सरकारने ऊर्जा क्षेत्रात आणीबाणी जाहीर केली आहे. हंगेरीच्या पंतप्रधान कार्यालयाने बुधवारी ही माहिती दिली. हंगेरीने ऊर्जा संसाधनांच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. पीएमओच्या म्हणण्यानुसार, दीर्घकाळ चाललेले युद्ध आणि ब्रुसेल्सच्या निर्बंधांमुळे संपूर्ण युरोपमध्ये उर्जेच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे.
Business Idea: सुरू करा ‘हा’ फायदेशीर व्यवसाय झाडापासून मिळणार 6 लाख रुपये; जाणून घ्या शेतीची पद्धत https://t.co/bjcb8rKPnB
— Krushirang (@krushirang) July 14, 2022
दरम्यान, या युद्धामुळे फक्त रशिया आणि युक्रेनच नाही तर युरोपसह अन्य देशांनाही फटका बसला आहे. विकसनशील आणि गरीब देशही या युद्धाचे चटके सहन करत आहेत. युरोपातील देश श्रीमंत आहेत. त्यांची लोकसंख्याही कमी आहे. हे देश नुकसान सहन करून पुन्हा पूर्वपदावर येतीलही. मात्र, विकसनशील आणि गरीब देशांना या संकटातून बाहेर पडण्यास मोठा काळ लागणार आहे. या देशांच्या मोडकळीस आलेल्या अर्थव्यवस्था (Economy) पूर्वपदावर येण्यासाठी आणखी काही काळ लागणार आहे.