मोठी बातमी! UGC NET परीक्षा रद्द, लवकरच जाहीर होणार नवीन वेळापत्रक

UGC NET Exam : गेल्या काही दिवसांपासून देशाच्या राजकारणात चर्चेचा विषय बनलेल्या UGC NET परीक्षा बाबत केंद्र सरकारने (Central Government) मोठा निर्णय घेत अखेर ही परीक्षा रद्द केली आहे.

यामुळे आता पुन्हा एकदा नव्याने परीक्षा घेण्यात येणार आहे त्यासाठी लवकरच वेळापत्रक देखील जाहीर होणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

04 जून या परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला होता मात्र निकाल राहील झाल्यानंतर बिहार, उत्तर प्रदेशसह अन्य राज्यातील विद्यार्थ्यांनी या परीक्षेत पेपर लीक झाल्याचा आरोप केला होता. 

तर दुसरीकडे देशाचे सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) या प्रकरणात सीबीआयची चौकशी करावी या मागणीसाठी अनेक जनहित याचिका देखील दाखल करण्यात आले आहे. 

शिक्षण मंत्रालयाने आपल्या निवेदनात असेही म्हटले आहे की परीक्षा प्रक्रियेची पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी, भारत सरकारने UGC-NET जून 2024 ची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन परीक्षा घेतली जाईल, ज्याची माहिती स्वतंत्रपणे सामायिक केली जाईल. तसेच हे प्रकरण सखोल तपासासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्यात येत आहे.

Leave a Comment