पुणे : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगत होते, की काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याची वेळ आल्यास शिवसेनेचे दुकान बंद करीन. काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत न जाण्याची बाळासाहेबांची भूमिकाच आम्ही कायम ठेवली आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ अभियानाच्या निमित्ताने पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांची भूमिका काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचीच आहे, असे स्पष्टपणे दिसून येत आहे. दोन्ही काँग्रेसच्या विळख्यातच उद्धव ठाकरे यांची शिवसेना पूर्णपणे अडकलेली आहे,’ असे सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ अभियानाच्या निमित्ताने पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांची भूमिका काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचीच आहे, असे स्पष्टपणे दिसून येत आहे. इतकी वाताहत झाल्यानंतरही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या विळख्यातच अडकलेले आहेत, अशी टीका राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. ‘राज्यातील सरकार पडणार, मध्यावधी निवडणुका होणार. राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होईल, अशा विविध प्रकारच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहेत. प्रत्यक्षात या चर्चेला काहीच अर्थ नाही. सरकारकडे १७० आमदारांचे पाठबळ आहे. आणखी १२ आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आहे. त्या आमदारांना रोखून धरण्यासाठी अशाप्रकारे वल्गना केल्या जात आहेत,’ असे सामंत म्हणाले.
must read
- Apple watch saved lives: अरेव्वा! या उपकरणामुळे वाचले अल्पवयीन मुलीचे प्राण…
- Cricket Live: बुम.. बुम.. बुमराह जोमात..! पहा काय कारनामा केलाय त्याने इंग्लंडमध्ये