दिल्ली – चीनने पुन्हा एकदा तैवानला (Taiwan) त्रास देण्याचा प्रयत्न केला. शनिवारी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्स (PLAAF) च्या दोन रशियन बनावटीच्या सुखोई लढाऊ विमानांनी तैवानच्या हवाई हद्दीत प्रवेश केला. चिनी फायटर जेटने हवाई हद्दीत प्रवेश केल्यानंतर तैवानचे लष्करही सतर्क झाले आणि त्यांनी चीनला (China) प्रत्युत्तर देण्यासाठी आपली दोन लढाऊ विमाने पाठवली. याबरोबरच तैवानच्या लष्कराने रेडिओ अलर्टही जारी केला होता.
तैवानचे लढाऊ विमान पाहून चिनी लढाऊ विमाने परतले. चीनच्या लढाऊ विमानांचा मागोवा घेण्यासाठी तैवानने हवाई संरक्षण क्षेपणास्त्र यंत्रणाही तैनात केली आहे. तैवानमध्ये चीनच्या विमानाची घुसखोरी स्थानिक वेळेनुसार सकाळी 9 आणि दुपारी 1.23 वाजण्याच्या दरम्यान घडली. तैवान एअरस्पेसच्या नैऋत्य विभागातील डोंगशा बेटाच्या ईशान्येस दोन्ही विमानांचा मागोवा घेण्यात आला. चीनच्या लढाऊ विमानांनी तैवानच्या हवाई हद्दीत प्रवेश करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही चीनने असे प्रकार अनेकदा केले आहेत.
चीनने तैवानवर आक्रमण करण्याची वारंवार धमकी दिली आहे. अशा स्थितीत हमल्याची शक्यता बळावली असल्याचे काही लोकांचे मत आहे. दुसरीकडे, युक्रेनबाबत लष्करी अपयश लक्षात घेऊन चीन सावधगिरी बाळगू शकतो, असा आणखी एक युक्तिवाद केला जात आहे. गेल्या काही वर्षांपासून जगातील अनेक देशांचा तैवानला पाठिंबा मिळत आहे. याबरोबरच तैवानमधील लोकांमध्येही आधीपेक्षा जागरूकता वाढली आहे. हे चीनसाठी चिंतेचे कारण आहे.
दरम्यान, रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर, चीन बळाचा वापर करून स्वशासित लोकशाही तैवानचा ताबा घेण्याची भीती वाढली आहे. चीन तैवानवर दावा करतो. 1949 मध्ये गृहयुद्धानंतर तैवान राजकीयदृष्ट्या मुख्य चिनी भूभागापासून वेगळा झाला. त्याचे केवळ 15 औपचारिक राजनैतिक सहकारी आहेत. चीनने गेल्या वर्षभरापासून तैवानमध्ये घुसखोरीत वाढ केली आहे.
याशिवाय चीन रशियालाही पाठिंबा देत आहे. युक्रेनच्या सार्वभौमत्वाचे समर्थन करत चीननेही रशियाची बाजू घेतली. नाटोसारख्या संघटनांचे नाव न घेता ते म्हणाले की, रशियाला स्वतःचे रक्षण करण्याचा अधिकार आहे. याबरोबरच युक्रेनवरील आक्रमणामुळे जगभरातील देश रशियावर निर्बंध टाकत असताना चीन अजूनही हे निर्बंध योग्य नाहीत, असे सांगत आहे.
आणि चीन पडला तोंडघशी..! पहा तैवान देशाने नेमका कसा दिलाय युद्धखोरांना झटका
रशिया युक्रेनच्या युद्धात तैवान आलाय धोक्यात..! पहा, चीनच्या भीतीने अमेरिकेने घेतलाय ‘हा’ निर्णय..