twitter elon musk tweet: मुंबई (Mumbai): अनेक महिन्यांच्या व्यावसायिक नट्यानंतर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलोन मस्क यांनी अखेर ट्विटरचा ताबा घेतला आहे. इलॉन मस्क आणि ट्विटर यांच्यातील हा अधिग्रहण (eal between Elon Musk and Twitter) करार पूर्ण झाला आहे. तसेच करार पूर्ण झाल्यानंतर मस्कने ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल (witter CEO Parag Agrawal) तसेच कंपनीच्या अनेक उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.
ही खरेदी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आपल्या ट्विटमध्ये मस्कने कंपनीसाठी आपली काही उद्दिष्टे (goals for the company) निश्चित केली आहेत. “याबाबत अगोदरच बरीच अटकळ बांधली गेली आहे. त्यात अनेकांची बहुतेक चूक झाली आहे. मी ट्विटर खरेदी केले कारण मानवी सभ्यतेच्या भविष्यासाठी अशा एका सामान्य डिजिटल टाउन स्क्वेअरची मोठी आवश्यकता (Twitter because the future of civilization requires a common digital town square) आहे. यावर हिंसाचाराचा अवलंब न करता वेगवेगळ्या कल्पनांवर निरोगी विचारांनी चर्चा केली जाऊ शकते. सध्या जगाला एक मोठा धोका आहे की सोशल मीडिया अत्यंत उजव्या आणि कट्टर डाव्या आवाजांमध्ये (social media will divide into extreme right and ultra-left voices ) विभागला गेला आहे. ज्यामुळे अधिक द्वेष निर्माण होत आहे, आणि ज्यामुळे आपल्या समाजात उभी फूट पडेल अशी भीती आहे. या दोन्ही गटांनी असे केल्याने संवादाची संधी गमावली जाते.”
- Busiest airport in the world: अरे बापरे! भारतातील ‘हे’ विमानतळ बनले जगातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक
- Goa Business News : म्हणून गोव्यात आता बिअर महागणार
- Business News : आयएमएफने का दिला परकीय चलन साठा वाचवण्याचा सल्ला : वाचा सविस्तर
एक दिवसापूर्वीच मस्क हे सिंक घेऊन ट्विटरच्या ऑफिसमध्ये पोहोचले होते. इलॉन मस्कने त्यांच्या बायोमध्ये ” ट्विटरचा मुख्य” लिहिले आहे. सुमारे $ 44 अब्ज ट्विटर अधिग्रहण कराराच्या (Twitter acquisition deal) समाप्तीपूर्वी त्यांनी असे सूचित केले होते. आता सॅन फ्रान्सिस्कोमधील Twitter मुख्यालयाने (San Francisco) त्यांचा सिंक वाहून नेत असलेला एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिले आहे, “ट्विटर मुख्यालयात प्रवेश करा – त्यास आत जाऊ द्या!” अर्थात मस्क असे म्हणत असले तरी फेसबुकच्या मार्क जुकेरबर्ग (Facebook’s Mark Zuckerberg) यांच्याच प्रमाणे जगभरातील कट्टर उजव्या विचारांचे हस्तक होतात याकडे अवघ्या जगाचे लक्ष आहे. कारण, जे बोलले ते न करता दिशाभूल करून श्रीमंत होण्याचा त्यांचा मार्ग जगजाहीर आहे.
Dear Twitter Advertisers pic.twitter.com/GMwHmInPAS
— Elon Musk (@elonmusk) October 27, 2022