Twitter Elon Musk : जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती (Rich businessman) एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरचे संपादन पूर्ण केले आहे. संपादन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि मायक्रोब्लॉगिंग साइटचे (A microblogging site) सीईओ (CEO) आणि सीएफओ (CFO) यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. “पक्षी मुक्त झाला आहे (The Bird is freed),” अस ट्विट त्यांनी गुरुवारी त्याचे ४४ अब्ज डॉलरचे संपादन पूर्ण केल्यानंतर केले. कंपनीने पोस्ट केल्या जाऊ शकणार्या सामग्रीवर कमी मर्यादा आहेत, हे पाहण्याच्या त्याच्या इच्छेला ट्विटरच्या बर्ड लोगोचा (Bird logo) संदर्भ देत स्पष्टपणे होकार दिला.
- Market Closing : सात दिवसांची उत्साही घौडदौड थांबली
- Metaverse : “मेटावर्स’मध्ये प्रवेश करणारी ‘ही’ पहिली भारतीय कंपनी
- Opening Bell : निफ्टी १७,८०० तर सेन्सेक्स ६०,००० च्या वर
- Reliance Jio : रिलायन्स जिओच्या या कंपनीचा नफा ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
यावर्षी १३ एप्रिल रोजी एलॉन मस्कने ट्विटरच्या (Elon musk) अधिग्रहणाची (Acquisition) घोषणा केली होती. त्यांनी ५४.२ डॉलर (Dollar) प्रति शेअरच्या (per share) दराने ४४ अरब डॉलरमध्ये या (billion dollar) कराराचा प्रस्ताव मांडला होता. मात्र, नंतर हा करार ठप्प झाला. इलॉन मस्क म्हणाले की, ट्विटरवर मोठ्या प्रमाणात बनावट खाती (fake accounts) आहेत. जेव्हा ट्विटर संपूर्ण आणि योग्य माहिती देईल तेव्हाच ते ही कंपनी खरेदी करेल. यामुळे ट्विटर आणि त्यांच्यात मतभेद (Disagreement) निर्माण झाले आणि त्यांनी ९ जुलै रोजी या करारातून माघार घेण्याची घोषणा केली.
यानंतर ट्विटरने अमेरिकेच्या न्यायालयात (American Court) मस्कविरोधात खटला दाखल केला. यावर डेलावेअरच्या न्यायालयाने (Court of Delaware) २८ ऑक्टोबरपर्यंत ट्विटरची डील (Twitter deal) पूर्ण करण्याचे आदेश दिले. बुधवारी अचानक मस्क सिंक (Sink) घेऊन ट्विटरच्या कार्यालयात पोहोचले. त्यानंतर मस्कने ट्विटर विकत घेतल्याची बातमी आली. ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर लगेचच मस्कने ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पराग अग्रवाल (Chief Executive Parag Agrawal), मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) नेड सेगल (Chief Financial Officer Ned Segal), कायदेशीर टीमच्या प्रमुख विजया गड्डे l(egal affairs and policy chief Vijaya Gadde) यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला.
इलॉन मस्कने ट्विटरची (Twitter) ची मालकी घेतली आहे, उच्च अधिकार्यांना ताबडतोब काढून टाकले आहे. परंतु प्रभावशाली सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मसाठी (Platform) त्याने सांगितलेल्या उदात्त महत्त्वाकांक्षा कशा साध्य कराल, याबद्दल थोडी स्पष्टता व्यक्त केली आहे.