TVS scooters : तुमच्या बजेटमध्ये खरेदी करा TVS ची स्कूटर, 45 kmpl मायलेजसह मिळतील शानदार फीचर्स; पहा किंमत

TVS scooters : भारतीय बाजारात TVS च्या सर्व स्कुटर्सना चांगली मागणी असते. मागणी आणि शानदार फीचर्स असल्याने कंपनीच्या स्कुटरची किंमत जास्त असते. पण बाजारात एक जी तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये खरेदी करता येईल.

मिळेल 19 लिटरचे मोठे अंडरसीट स्टोरेज

किमतीचा विचार करायचा झाला तर TVS Scooty Zest 110 74456 रुपये एक्स-शोरूमच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. या स्कुटरमध्ये 109.7 cc चे हाय पॉवर इंजिन देण्यात आले आहे. तर या कंपनीचा दावा आहे की हे इंजिन रस्त्यावर धावताना 45 kmpl पर्यंत मायलेज देते. या स्कूटरमध्ये लॅपटॉप, हेल्मेट आणि इतर वस्तू ठेवण्यासाठी 19 लिटरचा मोठा अंडरसीट स्टोरेज मिळेल. तर स्कुटरचे वजन 103 किलो इतके आहे आणि ते 5500rpm वर 8.8Nm टॉर्क निर्माण करते, ज्यामुळे ते उच्च पिकअप देते.

सीटची उंची आणि इंधन टाकी

TVS स्कूटी झेस्ट 110 ची सीटची उंची 760 मिमी इतकी आहे, स्कूटर रस्त्यावर नियंत्रित करणे सोपे आहे. ही एक लांब मार्गाची स्कूटर असून यात आरामदायी सिंगल सीट आणि 5 लिटरची इंधन टाकी देण्यात आली आहे. हाय स्पीडसाठी, स्कूटर 7.71 bhp पॉवर जनरेट करते. विशेष म्हणजे या स्कूटरचे टॉप मॉडेल 89436 रुपयांच्या ऑन रोड किमतीत तुम्हाला खरेदी करता येईल. कंपनीची ही शानदार TVS स्कूटर त्याच्या सेगमेंटमध्ये Honda Activa आणि Hero Pleasure ला टक्कर देते.

स्कूटी झेस्ट 110 चे फीचर्स

साधे हँडलबार आणि डिजिटल कन्सोल
एकत्रित ब्रेकिंग सिस्टम
दुहेरी रंग पर्याय
समोर आणि मागील ड्रम ब्रेक
बॅग हुक, पायांची मोठी खोली

Leave a Comment