TVS electric scooter : पुढच्या आठवड्यात लॉन्च होणार TVS ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर, ओला आणि एथरला देईल टक्कर

TVS electric scooter : जर तुम्ही नवीन इलेक्ट्रिक स्कुटर खरेदी करणार असाल तर जरा थांबा. कारण बाजारात आता पुढच्या आठवड्यात TVS ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लाँच होणार आहे. जी ओला आणि एथरला टक्कर देईल.

TVS iQube ची किंमत आणि फीचर्स

TVS iQube ही सर्वात सुरक्षित स्कूटर मानली जात असून आता ती जास्त परवडणारे देखील झाली आहे. TVS ने या स्कूटरच्या नवीन प्रकारात 2.2 kWh बॅटरी पॅक प्रदान केला असून त्याची एक्स-शोरूम किंमत 95 हजार रुपये ठेवली आहे. सध्या तुम्हाला खास स्कुटर लहान बॅटरी पॅकसह खरेदी करता येईल. तसेच बॅटरीशिवाय या स्कूटरच्या कोणत्याही पैलूमध्ये कोणताही बदल केला नाही.

कंपनीच्या या शानदार स्कूटरमध्ये 2.2 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक मिळेल. कंपनीची ही स्कूटर 2 तासात 80% पर्यंत चार्ज होते. तर स्कुटरची ड्रायव्हिंग रेंज 75 किलोमीटर इतकी आहे. तर या स्कूटरमध्ये 32 लीटर अंडर सीट स्टोरेज मिळेल. जिथे तुम्ही दोन हेल्मेट एकत्र ठेवता येईल. स्कुटरच्या लांब सीट मऊ आणि आरामदायी आहे. अनेक लहान-मोठी स्टोअर्सही यात उपलब्ध आहेत. तर 17.78 सेमीचा टच स्क्रीन डिस्प्ले तुम्हाला पाहायला मिळेल.

या कंपन्यांना देईल टक्कर

महत्त्वाचे म्हणजे TVS iQube ची थेट स्पर्धा Ather इलेक्ट्रिक स्कूटरशी असून नुकतीच Ather कडून आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Rizta लाँच करण्यात आली आहे. किमतीचा विचार केला तर स्कुटरची किंमत 1.10 लाख रुपयांपासून सुरू होते.

कंपनीची ही स्कूटर दोन बॅटरी पॅकसह येते आणि त्याची रेंज एका चार्जवर 160 किलोमीटरपर्यंत जाते. कुटुंबासाठी हा एक चांगला पर्याय आहे, असा कंपनीचा दावा आहे. इतकेच नाही तर फीचर्स आणि स्पेसच्या बाबतीत ही स्कूटर चांगली आहे.

Leave a Comment