Turmeric Cultivation । शेतकऱ्यांनो, हळद लागवड करताना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी; होईल दुप्पट फायदा

Turmeric Cultivation । जर तुम्ही शेती करत असाल तर तुम्ही शेती करण्यापूर्वी योग्य ते नियोजन करणे खूप गरजेचे आहे. शेतीमध्ये जास्त कष्ट केले तर त्याचा फायदा देखील खूप होतो. नफा जास्त मिळत असल्याने हल्ली तरुणवर्ग देखील शेती करू लागला आहे.अनेक शेतकरी हळद लागवड करतात.

यातून पैसे देखील जास्त मिळतात. जर तुम्हाला हळद लागवडीतून जास्त पैसे मिळवायचे असतील तर तुम्ही हळद लागवड करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. तुम्हाला जास्त फायदा होईल.

अहवालानुसार सांगायचे झाले तर उष्ण आणि दमट हवामानात हळद चांगली वाढते. यासाठी 20 ते 30 अंश सेल्सिअस तापमान योग्य असून चांगला निचरा होणारी, चिकणमाती किंवा वालुकामय माती हळदीसाठी योग्य आहे. तसेच मातीचा pH 6.5 ते 8.5 च्या दरम्यान असणे गरजेचे आहे. हळदीच्या चांगल्या उत्पादनासाठी खताचा योग्य वापर करावा. इतकेच नाही तर शेणखत, निंबोळी पेंड आणि युरिया यांचा वापर फायदेशीर ठरतो.

किती महिन्यांत तयार होते पीक?

तुरीची पेरणी जून-जुलै महिन्यात करण्यात येते, हे लक्षात ठेवा. पेरणीसाठी निरोगी आणि रोगमुक्त कंद निवडणे खूप महत्त्वाचे आहे. सिंचनाविषयी बोलायचे झाले तर त्यासाठी नियमित सिंचन खूप गरजेचे आहे. इतकेच नाही तर शेतकऱ्यांनी लागवड करताना नियमितपणे तण काढावी. त्यामुळे तणांची वाढ थांबून पिकाला पोषक तत्वे मिळत असतात. काढणीबद्दल सांगायचे झाले तर हळदीचे पीक ९-१० महिन्यांत तयार होते. तर काढणीनंतर ते पीक उन्हात वाळवले जाते.

सेंद्रिय शेती

तज्ज्ञांच्या मतानुसार, हळद लागवडीसाठी सेंद्रिय पद्धतीचा वापर करणे खूप गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे पीक मिश्र शेती म्हणूनही घेता येते. हळदीच्या सुधारित वाणांची लागवड करून शेतकऱ्यांना जास्त उत्पादन घेता येते.

Leave a Comment