Turkiye-Syria Earthquake : तुर्की आणि सिरीयात (Turkiye Syria Earthquake) भुकंपांची मालिका काही केल्या थांबायला तयार नाही. पुन्हा या भागात जमीन हादरली. तुर्कस्तान-सीरिया प्रदेशापासून दोन किलोमीटर खोलीवर भूकंप झाला. युरोपियन भूमध्य भूकंपशास्त्र केंद्र (EMSC) ने सांगितले की, सोमवारी 6.4 तीव्रतेचा भूकंप झाला, ज्यामुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले आणि तीन लोकांचा मृत्यू झाला. तुर्कस्तान आणि सीरियामध्ये ६ फेब्रुवारी रोजी झालेल्या भूकंपाने हाहाकार माजला होता, ज्यामध्ये हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.
6.4-रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे तुर्की (Turkiye) आणि सीरिया (Syria) या दोन्ही देशांच्या सीमावर्ती भागात नुकसान झाले आहे. जेथे 6 फेब्रुवारीला भूकंपाने कहर केला होता. ताज्या भूकंपामुळे आधीच नुकसान झालेल्या अनेक इमारती कोसळल्या. यामुळे मदतकार्यात अडथळा निर्माण झाला आहे, तसेच 3 जणांचा मृत्यू झाला असून 213 जण जखमी झाले आहेत. भूकंपानंतर (Earthquake) आतापर्यंत 32 धक्के बसले आहेत.
- Gold Investment साठी ‘हे’ आहेत खास पर्याय; काळजी नको, मिळेल चांगला नफा
- IPL 2023 : सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज कोण ? ; रोहित शर्मा नाही तर..
- IND vs PAK : क्रिकेट चाहत्यांची घोर निराशा; पाकिस्तान संघाने घेतला ‘हा’ निर्णय
- PM-SHRI Scheme : शाळा होणार मॉडेल; ‘त्यासाठी’ मोदी सरकारने 9 हजार शाळा केल्या सिलेक्ट
- PF Balance : कंपनी तुमच्या खात्यात पीएफचे पैसे टाकते का ? ; ‘या’ सोप्या पद्धतींनी मिळवा माहिती
तुर्कस्तानच्या आपत्ती एजन्सीच्या म्हणण्यानुसार, 5.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला आणि दक्षिणी हताय प्रांतातील अंताक्यामध्ये 6.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. यापूर्वी झालेल्या भूकंपामुळे अजूनही लोकांमध्ये घबराट आहे. आज 6.4 तीव्रतेच्या भूकंपानंतर लगेचच लोक घराबाहेर पडले आणि सर्वत्र गोंधळ उडाला. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, त्याचे केंद्र तुर्कीमधील अंताक्या शहरात होते आणि त्यात अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, इजिप्त (Egypt) आणि लेबनॉनमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.
6 फेब्रुवारीला तुर्की-सीरियात भूकंप झाला होता. या भूकंपामुळे दोन्ही देशांत मोठी हानी झाली होती. भूकंपामुळे आतापर्यंत एकूण 45 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून हा आकडा दररोज वाढत आहे. भूकंपाची तीव्रता 7.8 असल्याने हजारो इमारती कोसळल्या आणि लाखो लोक त्यात अडकले. जलद बचावकार्य सुरू असतानाही मोठ्या संख्येने लोकांना जीव गमवावा लागला.