Turkiye Earthquake : तुर्कीमध्ये नैसर्गिक संकटे सुरू आहेत. आज पुन्हा एकदा भूकंपाने (Turkiye Earthquake) येथील जमीन हादरली. मध्य तुर्की भागात शनिवारी ५.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाला.युरोपीयन भूमध्य भूकंप विज्ञान केंद्र (EMSC) नुसार भूकंप 10 किमी (6.21 मैल) खोलीवर होता. मात्र, भूकंपानंतर जीवित वा वित्तहानी झाल्याची कोणतीही माहिती मिळालेली नाही.
तुर्कस्तान आणि सीरियामध्ये नुकत्याच झालेल्या भूकंपामुळे मृतांची संख्या ४५ हजारांच्या पुढे गेली आहे. बचावकार्य सुरू असल्याने मृतांचा आकडा वाढत आहे. भूकंपामुळे तुर्कीमधील अडीच लाखांपेक्षा जास्त रहिवासी इमारती उद्धवस्त झाल्या आहेत. यामध्ये राहणाऱ्या लाखो लोकांपैकी बरेच लोक मारले गेले आहेत किंवा जखमी झाले आहेत किंवा बेपत्ता आहेत. लाखो लोकांचे प्राण वाचले पण त्यांचे सर्व काही संपले आहे आणि कडाक्याच्या थंडीत ते मूलभूत सुविधांविना दिवस काढत आहेत.
- Gold Investment साठी ‘हे’ आहेत खास पर्याय; काळजी नको, मिळेल चांगला नफा
- IPL 2023 : सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज कोण ? ; रोहित शर्मा नाही तर..
- IND vs PAK : क्रिकेट चाहत्यांची घोर निराशा; पाकिस्तान संघाने घेतला ‘हा’ निर्णय
- PM-SHRI Scheme : शाळा होणार मॉडेल; ‘त्यासाठी’ मोदी सरकारने 9 हजार शाळा केल्या सिलेक्ट
- PF Balance : कंपनी तुमच्या खात्यात पीएफचे पैसे टाकते का ? ; ‘या’ सोप्या पद्धतींनी मिळवा माहिती
तुर्कस्तान आणि सीरियामध्ये वीस लाखांपेक्षा जास्त बेघर लोक तात्पुरत्या केलेल्या निवाऱ्यांत राहत आहेत.तुर्कस्तानच्या भूकंपग्रस्त भागात बचावकार्य सुरू झाले असून आता मदत साहित्य पोहोच होत आहे. मात्र, सीरियातील (Syria Earthquake) परिस्थिती भयावह आहे.भूकंपामुळे तिथल्या उत्तर-पश्चिम भागात प्रचंड विध्वंस झाला आहे.हा भाग बंडखोरांच्या ताब्यात आहे आणि ते प्रभावित भागात मदत पुरवठा पोहोच करण्यात अडथळे आणत आहेत. भुकंपग्रस्तांसाठी भारतानेही मदत दिली आहे. काश्मीरच्या मुद्द्यावर तुर्कीचे राज्यकर्ते पाकिस्तानला साथ देत सातत्याने भारताला टार्गेट करण्याच्या प्रयत्नात असतात. अशा परिस्थितीतही भारताने माणुसकीचा विचार करत भुकंग्रस्त तुर्कीला मदत पोहोच केली होती.