Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Ashok Stambh: फॅशन आली आहे महापुरुषांचे, मोठमोठ्या चरित्रांचे क्रूर चेहरे चितारण्याची

Please wait..

Ashok Stambh: सध्या सेंट्रल व्हिस्टा अर्थात नव्या संसद भवनाच्या (Central Vista, the new parliament building) बांधकामाने गती घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीमला (Prime Minister Narendra Modi’s team) देशात ‘नवा भारत’ (new India) घडवताना जुने बासनात गुंडाळायचे आहे. वेळोवेळी ते स्पष्ट झालेले आहे. आताही “आपल्याकडे सध्या फॅशन आली आहे महापुरुषांचे, मोठमोठ्या चरित्रांचे क्रूर चेहरे चितारण्याची” (changing the posture of the lion on the Ashoka pillar) असे लेखक आणि सामाजिक अभ्यासक श्रीकांत आव्हाड (Writer and social scholar Shrikant Awhad) यांनी त्यांच्या फेसबुकवर एक सविस्तर पोस्टमध्ये म्हटले आहे. आम्ही ही जशीच्या तशी प्रसिद्ध करीत आहोत.

Advertisement

https://www.facebook.com/photo/?fbid=5785285731538060&set=a.139664719433551

Advertisement

आपल्याकडे सध्या फॅशन आली आहे महापुरुषांचे, मोठमोठ्या चरित्रांचे क्रूर चेहरे चितारण्याची… शिवाजी महाराजांचा शांत संयमी धीरगंभीर चेहरा आजकाल रागीट दिसायला लागला आहे, संभाजीराजांचा आत्मीविश्वासपूर्वक आणि आक्रमक असणारा पारंपरिक चेहरा आता क्रूरतेकडे झुकायला लागला आहे, हनुमानाच्या चेहऱ्यावर आता समाधानी शांतता न दिसता आठ्या पडलेल्या दिसायला लागल्या आहे, रामाच्या बाबतीतसुद्धा आता हेच होताना दिसायला लागलं आहे, अशी बरीच उदाहरणे पाहायला मिळतील… आपले चिडके, रागीट, क्रूर व्हायला लागलेले स्वभाव हळूहळू या महापुरुषांच्या चेहऱ्यावर यायला लागले आहेत, कारण त्यांचे चित्र आपण बनवतोय, त्यामुळे आपलीच वृत्ती त्यांच्या चेहऱ्यावर दिसायला लागली आहे. साहजिक, सेंट्रल व्हिस्टावरील अशोकस्तंभासारखे बनवलेले सिंह रक्ताला चाटवल्यासारखे बनवले जात असतील तर त्यात काही वावगे नाही.

Advertisement

Advertisement
Loading...

हा अशोकस्तंभ नाहीये. सेंट्रल व्हिस्टावर उभारलेली चार सिंहांची अशोकस्तंभासारखी दिसणारी प्रतिमा अशोकस्तंभ नाहीये.  कपाळावर आठ्या असणाऱ्या, सतत चिडचिड करणाऱ्या माणसाच्या जवळ कुणीच जात नाही, त्याच्याशी कुणीच कसलेही संबंध ठेवत नाही… इथे रागीट डोळे असणारे, रक्ताला चटावलेले, क्रूर सिंह दाखवून त्याला अशोकस्तंभ म्हणायचे? काय साध्य होणार आहे? अशोकस्तंभ हि काल्पनिक गोष्ट नाहीये कि कुणीही आपल्या मनाप्रमाणे तयार करावी, आणि त्यामध्ये आपल्याला हवे तसे भाव चितारावेत… अशोकस्तंभ हा सम्राट अशोकने उभारलेला चार सिंहांचा समूह असणारा स्तंभ आहे जो आपण राष्ट्रीय प्रतीक म्हणून जसाच्या तसा कोणताही बदल न करता स्वीकारलेला आहे. त्याला अशा रक्ताला चटावलेल्या चेहऱ्याचे स्वरूप देणे विकृती आहे. हा चार सिंहांचा पुतळा अशोकस्तंभ नाही. हा अशोकस्तंभासारखा दिसणारा एक पुतळा आहे फक्त. मूळ अशोकस्तंभ आणि हा पुतळा शेजारी शेजारी ठेवला तर मूळ स्तंभातली अदब कुठेतरी हरवून त्याजागी बळजबरी दाखवली जात असलेली क्रूरता दिसून येईल.

Advertisement

Advertisement

प्रतीकात्मक गोष्टी आणि प्राण्यांचे फोटो किंवा चित्र यातला फरक सुद्धा बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही. प्रतीकात्मक गोष्टींमध्ये चित्र वाटावे असे हावभाव नसतात, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. उद्या राष्ट्रीय प्राणी म्हणून वाघाचा पुतळा लावायचा असेल तर आपण त्याला हुभेहूब रागीट चेहऱ्याचा बनवू शकतो, पण तो प्रतीक म्हणून वापरायचा असेल तर त्यातून विविध अर्थ अभिप्रेत असतात त्यानुसार तो बनवला जातो. याच प्रकारे अशोकस्तंभाकडे सुद्धा पाहणे आवश्यक आहे. अशोककस्तंभ हा सिंहाचा पुतळा दाखवायचं काम करत नाही, तर तो त्यामाध्यमातून विविध प्रतीकांचं प्रकटीकरण करतो. यासोबत त्याखाली असणारे बैल, घोडा यासारखे प्राणी सुद्धा विविध अर्थ सांगण्याचे काम करतात. ते जसेच्या तसे दिसायला ते चित्र नाहीये. ती प्रतीकात्मक कलाकृती आहे.

Advertisement

Advertisement

सम्राट अशोकचे चार सिंह हे सांगतात कि आम्ही शांत आहोत, पण सिंह शांत आहे म्हणून त्याला डिवचयाचे नसते, तर त्याला आदरच द्यायचा असतो. हे प्रतीक आहेत सामर्थ्याचे, ताकदीचे, आदराचे, सन्मानाचे… (अशोकस्तंभामध्ये सुद्धा रागीट सिंह आहे, पण तोसुद्धा चांगलाच वाटतो, त्याच्याकडे बघून दुसरीकडे बघायची इच्छा होईल असा तो नाहीये) अशोकस्तंभामध्ये असलेले सिंह आपल्याला त्यासमोर अदबीने झुकायला भाग पाडतात तर हे नवे सिंह तुम्ही आमच्याकडे याला तर तुमचा फडशाच पाडला जाईल एवढंच सांगण्याचे काम करत आहेत. आपल्याला आपल्याच राष्ट्रीय प्रतीकांकडे बघून भीती वाटायला लागली आहे अशी अवस्था झाली आहे. काहीही झालं कि ‘ये नया भारत हे’ म्हणणारे एक भलतेच वाढलेत… कसला नया भारत है बे? कुणाला खायला उठलाय हा नया भारत ते तरी कळू द्या एकदा… उद्या ‘नया भारत है’ म्हणून राष्ट्रध्वजाच्या अशोकचक्रामध्ये २४ अऱ्यांऐवजी २४ तलवारी दाखवू नये एवढीच आता अपेक्षा राहिली आहे… विठ्ठलाSSS विठ्ठला

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply