Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

राजकारणात खळबळ..! भाजप विरोधकांना मोठा झटका; ‘केसीआर’ यांनी घेतला ‘हा’ निर्णय..

दिल्ली – तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (Chief Minister K. Chandrashekhar Rao) राष्ट्रीय राजकारणात एन्ट्री घेण्याच्या तयारीत आहेत. जूनमध्ये त्यांनी राष्ट्रीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. याआधी केसीआर यांनी विरोधी पक्षांच्या अनेक बड्या नेत्यांबरोबर बैठक घेतली होती. भारतीय जनता पक्षाविरोधात मोर्चेबांधणी करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात होते. अलीकडेच तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी एका मोठ्या बातमीचे संकेत दिले होते.

Advertisement

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नव्या पक्षाबाबत अंतिम निर्णय 19 जूनला होणार आहे. शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी राज्याचे मंत्री आणि पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. ‘भारत राष्ट्र समिती’ च्या (Bharat Rashtra Samiti) नावावर एकमत झाल्याचे मानले जात आहे. त्याचबरोबर या पक्षाची निवडणूक आयोगाकडे नोंदणीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, (Arvind Kejariwal) समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) आणि माजी पंतप्रधान देव गौडा यांची भेट घेतल्यानंतर केसीआर म्हणाले होते की, लवकरच देशात खळबळ उडेल. भाजप आणि काँग्रेसविरोधी शक्तींना एका व्यासपीठावर आणण्यात अपयशी ठरल्यानंतर केसीआर यांनी राष्ट्रीय पक्ष घोषित करण्याचा विचार केल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.

Loading...
Advertisement

गेल्या काही महिन्यांत शिवसेना, DMK, RJD, SP आणि JD(S) यासह अनेक राजकीय पक्ष भाजप आणि काँग्रेसच्या पर्यायाबाबत कोणत्याही आघाडीवर एकमत होऊ शकलेले नाहीत. ओडिशाचे सीएन नवीन पटनायक आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांना सोबत आणण्यात ते अपयशी ठरले आहेत. या सर्व घडामोडी पाहता भाजप विरोधात विरोधी पक्षांची मोट बांधणे अशक्य दिसत आहे. त्यामुळे आता राव यांनी हा विचार सोडून दिल्याचे दिसत आहे. असे जर घडले तर विरोधी पक्षांना हा एक मोठा धक्का ठरेल.

Advertisement

काँग्रेसला जोरदार धक्का..! ‘या’ राज्यांतील निवडणुकांत दणदणीत पराभव; भाजपने केलीय जबरदस्त कामगिरी..

Advertisement
Advertisement

Leave a Reply