Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Weather Update : जूनमध्येही कडाक्याचा उन्हाळा; ‘या’ राज्यात येणार उष्णतेची लाट; जाणून घ्या..

दिल्ली – राजधानी दिल्लीसह देशाच्या अनेक भागांत कडकाचा उन्हाळा अजूनही जाणवत आहे. उत्तर भारतात डोंगरापासून मैदानापर्यंत आणि मध्य भारतात उष्णतेच्या लाटेमुळे (Heat Wave In North India) परिस्थिती अधिकच बिकट आहे. दिल्ली (Delhi) आणि लगतच्या भागात वाढणाऱ्या उष्णतेबाबत हवामान खात्याने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार, हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागांमध्ये उष्णतेची लाट राहील. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या सक्रियतेमुळे 11 जूनपासून काहीसा दिलासा मिळेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

Advertisement

आयएमडीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आर. के. जेनामानी यांनी सांगितले की, दिल्लीत ऑरेंज अलर्टबरोबरच (Orange Alert) हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश, राजस्थानच्या काही भागात 4 जूनपासून उष्णतेची तीव्र लाट आहे. तापमान (Temperature) 44°-47° दरम्यान बदलते, जे आणखी दोन दिवस टिकेल.

Advertisement

स्कायमेट वेदरनुसार (Skymate Weather), आजही सूर्य दिल्ली एनसीआर, पंजाब, उत्तराखंड, पश्चिम राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ आणि झारखंडच्या विविध भागांमध्ये उष्णतेचा वर्षाव करेल. गेल्या 24 तासांत पंजाब, उत्तराखंड, पश्चिम राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ आणि झारखंडच्या मोठ्या भागात उष्णतेची लाट पसरली आहे.

Loading...
Advertisement

दिल्ली एनसीआरच्या काही भागात पारा 45 अंशांच्या पुढे जात असल्याने हवामान खात्याने यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. पुढील काही दिवस दिल्लीतील कमाल तापमान 44 ते 46 अंशांच्या दरम्यान राहील, असे आयएमडीचे शास्त्रज्ञ आरके जेनामानी यांनी म्हटले आहे. नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे शनिवार आणि रविवारी काहीसा दिलासा मिळू शकेल. हिमाचल प्रदेशमध्ये उना, मंडी, कांगडा, हमीरपूर, बिलासपूर, सिरमौर आणि सोलन येथे 8 आणि 9 जून रोजी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. दोन दिवस काही ठिकाणी पावसाचीही शक्यता आहे. हवामान खात्याने 10 आणि 11 जून रोजी लाहौल स्पिती, उना, हमीरपूर, सोलन आणि सिरमौर वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये गडगडाटी वादळ आणि वीज पडण्याचा इशारा जारी केला आहे. काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

Advertisement

पंजाबमध्ये (Punjab) बुधवारी हवामान पुन्हा उग्र होईल आणि तापमानात वाढ होईल. चंदीगडमध्ये उष्णतेची लाट राहणार असून उष्ण वाऱ्यांमुळे तापमानाचा पारा वाढल्याचे हवामान केंद्राने सांगितले आहे. पुढील पाच दिवस लोकांच्या अडचणी वाढणार असून तापमानात घट होण्याची शक्यता नाही. उत्तराखंडमध्ये भीषण उष्मा कायम आहे. हवामान केंद्रानुसार आजही राज्यात हवामान कोरडे राहील. तेजस्वी सूर्यप्रकाशासह उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. मैदानी भागात दिवसाचे तापमान काही ठिकाणी 41 अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते. त्याचबरोबर डोंगराळ भागातही उष्णता कायम राहणार आहे.

Advertisement

Weather Up date : आज ‘या’ राज्यांत येणार वादळ आणि पाऊस.. हवामान खात्याने दिलाय अलर्ट; जाणून घ्या..

Advertisement
Advertisement

Leave a Reply