दिल्ली – नुकत्याच पडलेल्या हलक्या पावसानंतर उत्तर भारतात पुन्हा एकदा उकाड्याने (Heat) लोकांना हैराण करायला सुरुवात केली आहे. वाढती आर्द्रता आणि जास्त तापमान यामुळे राजधानीत गेल्या काही दिवसांपासून अत्यंत अस्वस्थ परिस्थिती निर्माण झाली आहे. तथापि, भारतीय हवामान विभागाने (IMD) रविवारी सांगितले की, दमट हवामान 11 जूनपर्यंत कायम राहील.
हवामान खात्याने सांगितले की, राष्ट्रीय राजधानीला आता 11 जूननंतर मान्सून (Monsoon) ओडिशातून दाखल झाल्यानंतर दिलासा मिळेल. त्याआधी नैऋत्य मान्सून रविवारी केरळमध्ये त्याच्या नियोजित 1 जूनच्या तीन दिवस अगोदर पोहोचला, ज्यामुळे देशाच्या कृषी-आधारित अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण पावसाळी हंगामाची सुरुवात झाली. भारतीय हवामान विभाग (IMD) ने सांगितले की केरळमध्ये (Kerala) शनिवारपासून पाऊस (Rain) पडत आहे आणि राज्यातील 14 पैकी 10 हवामान निरीक्षण केंद्रांवर 2.5 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे, जो मान्सून सुरू होण्याच्या निकषांची पूर्तता करतो.
IMD च्या भुवनेश्वर (Bhubaneshwar) केंद्रातील हवामान शास्त्रज्ञ उमा शंकर दास म्हणाले, की “आर्द्रता पातळी 50 टक्क्यांपेक्षा जास्त वाढली आहे. असे दिसते की बाहेरचे तापमान (Temperature) 48 अंश सेल्सिअस आहे तर वास्तविक तापमान 37-38 अंश आहे. दिवसभरात गडगडाटी वादळाची शक्यता आहे, पण उष्मा आणि दमट परिस्थितीपासून फारसा दिलासा मिळणार नाही.”
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, दिल्लीत कमाल तापमान (Temperature In Delhi) 40.7 अंश सेल्सिअस नोंदले गेले, जे या हंगामासाठी सामान्य आहे, तर किमान तापमान 28.7 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे हंगामाच्या सरासरीपेक्षा दोन अंशांनी जास्त आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार, सोमवारी हवामान आल्हाददायक राहण्याची शक्यता आहे. आयएमडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “सोमवारी शहरात काही प्रमाणात ढगाळ आकाश राहील आणि गडगडाट होण्याची शक्यता आहे.” शहरातील कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 41 आणि 28 अंश सेल्सिअस आसपास राहण्याचा अंदाज आहे.
स्कायमेट वेदर (Skymate Weather) या खाजगी हवामान संस्थेच्या म्हणण्यानुसार, बंगाल, सिक्कीम, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि लक्षद्वीप भागात पुढील 24 तासांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय बिहार, केरळ, अंदमान आणि निकोबार बेटे, तामिळनाडू, दक्षिण कर्नाटक आणि पश्चिम हिमालयाच्या पायथ्याशी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या आगमनानंतर उत्तर भारतातील बहुतांश भागात पावसाचा खरा टप्पा सुरू होईल, असे हवामान संस्थेचे म्हणणे आहे. त्यात म्हटले आहे की 13 ते 15 जून दरम्यान मान्सूनची सुरुवात होणार आहे.
Weather Update : आज ‘या’ राज्यांत येणार वादळ आणि पाऊस.. हवामान खात्याने दिलाय अलर्ट; जाणून घ्या..