दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) 31 मे रोजी हिमाचल प्रदेशातील विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांच्या गटाशी संवाद साधतील. केंद्र सरकार स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या स्मरणार्थ ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करत आहे. याशिवाय 26 मे रोजी केंद्रातील भाजप नेतृत्वातील एनडीएच्या सत्तेला आठ वर्षे पूर्ण (NDA Government Completed 8 Years) झाली. या विशेष प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 मे रोजी हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांच्या गटाशी संवाद साधतील.
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर (Jairam Thakur) म्हणाले, की “केंद्राच्या कार्यकाळाला 8 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी संपूर्ण देशासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी हिमाचलमध्ये येत आहेत. 31 मे रोजी सकाळी 10:30 वाजता ते सकाळी 11 वाजता येथे येतील. ते म्हणाले, की “देशभरातील सर्व मुख्यमंत्र्यांबरोबर संवाद, विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधानांचा संवाद प्रत्येक जिल्हा मुख्यालयात आयोजित केला जाईल. पंतप्रधान हिमाचल प्रदेशातील जनतेलाही संदेश देणार आहेत. वृत्तानुसार, शिमला येथे पंतप्रधान मोदींच्या रॅलीला सुमारे 50 हजार शेतकरी तसेच केंद्र सरकारच्या विविध योजनांचे लाभार्थी उपस्थित राहतील.
स्वच्छ भारत मिशन, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि पोषण अभियान यांसारख्या योजनांच्या लाभार्थ्यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. याबरोबरच किसान सन्मान निधीचा 11 वा हप्ताही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. या दिवशी पंतप्रधान मोदी देशभरातील लाभार्थ्यांबरोबर संवाद साधणार आहेत. यामध्ये विविध 13 केंद्रीय योजनांचे लाभार्थी सहभागी होणार आहेत. जिल्हा पातळीवरही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
महागाई रोखण्यासाठी मोदी सरकारचा मेगा प्लान.. इंधनानंतर ‘या’ वस्तूंवर सरकारचे लक्ष; जाणून घ्या..
.. म्हणून मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात केली कपात; समजून घ्या एक एक गोष्ट