Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

.. म्हणून दिल्लीत वाढतेय पाण्याचे संकट..! कारण ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य; जाणून घ्या..

दिल्ली – आगामी काळात पाण्यावरून वाद होतील अशा बातम्या आपण याआधीही ऐकल्या असतील. मात्र, देशातील दोन राज्यात पाणी हेच वादाचे कारण ठरत आहे. होय, हरियाणातून यमुना नदीत (Yamuna River) पुरेसे पाणी सोडले गेले नाही म्हणून राजधानी शहरात पाण्याचे मोठे संकट उभे (Water Crisis In Delhi) राहिले आहे. राजधानीच्या जवळपास 30 टक्के भागात पिण्याच्या पाण्याचे संकट वाढत आहे. वास्तविक, यमुना नदीवर असलेल्या वजिराबाद बॅरेजमधील पाण्याची पातळी अत्यंत खालावली असल्याने दिल्ली जल बोर्डाच्या तीन जलशुद्धीकरण प्रकल्पांच्या पाणी पुरवठ्यावर (Water Supply) सुमारे 60 टक्के परिणाम झाला आहे.

Advertisement

हरियाणाच्या (Haryana) बाजूने यमुना नदीत अपुरे पाणी सोडल्याने वजिराबाद बॅरेजमधील पाण्याची पातळी सातत्याने कमी होत आहे. त्याचा थेट परिणाम दिल्ली जल बोर्डाच्या वजिराबाद, चंद्रवाल आणि ओखला जलशुद्धीकरण प्रकल्पांवर होत आहे. दिल्ली जल बोर्डाच्या म्हणण्यानुसार 60 टक्के पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे.

Advertisement

दिल्ली हे चारही बाजूंनी जमिनीने घेरलेले शहर आहे. येथील बहुतांश पाणीपुरवठा हा शेजारील राज्यांतून येणाऱ्या नदीतून होतो. उत्तर प्रदेश राज्य गंगा (Ganga River) आणि हरियाणा द्वारे यमुना नदीत पाणीपुरवठा होतो. त्याचबरोबर पंजाबच्या (Punjab) भाक्रामधूनही काही पाणी उपलब्ध होते. यापैकी सर्वाधिक पाणीपुरवठा हरियाणातून होतो. दिल्लीतील प्रमुख जलाशय असलेल्या वजिराबाद बॅरेजच्या 15 किलोमीटरवर यमुना नदी दिल्लीत प्रवेश करते. हा बॅरेज यमुना नदीवर 1959 मध्ये बांधण्यात आला होता. हा एक खास प्रकारचा बांध आहे, ज्यामध्ये मोठ्या दरवाजांची मालिका आहे. बॅरेज नद्यांचे प्रवाह आणि त्यांच्या पाण्याची पातळी नियंत्रित करते.

Loading...
Advertisement

आता मात्र दिल्लीत अनेक ठिकाणी पाण्याचे संकट उभे राहिले आहे. याआधीही असे प्रकार घडले आहेत. पाण्याच्या कारणावरून दिल्ली आणि हरियाणात वाद नेहमीचेच आहेत. आताही पाण्यामुळे वाद वाढण्याची शक्यता दिसत आहे.

Advertisement

अवघडच की.. दिल्ली विमानतळाखाली ‘हे’ संकट; वाचा तोंडचे पाणी पळवणारी भयंकर बातमी

Advertisement
Advertisement

Leave a Reply