Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

केजरीवाल यांचा विरोधकांना झटका.. 2024 च्या निवडणुकीत आप ‘तसे’ काही करणार नाही..

दिल्ली – राष्ट्रीय राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी विरोधकांच्या ऐक्याला मोठा धक्का दिला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी कोणत्याही महाआघाडीला त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. ते म्हणाले की त्यांची आघाडी फक्त 130 कोटी भारतीयांबरोबर असेल. केजरीवाल यांचे हे वक्तव्य भाजपविरोधात आघाडीची भाषा करणाऱ्या विरोधकांना जोरदार झटका देणारे आहे. याआधी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी देखील सांगितले होते, की 2024 च्या लोकसभा निवडणुकीआधी (Loksabha) बिगर-काँग्रेस आणि गैर-भाजप पक्षांची राजकीय आघाडी स्थापन करण्याच्या बाजूने मी नाही. ते म्हणाले की, सध्या आघाडीऐवजी टीआरएसच्या धर्तीवर देशाला पर्यायी अजेंड्याची गरज आहे.

Advertisement

नागपुरातील एका कार्यक्रमात केजरीवाल म्हणाले की, ते बहुपक्षीय आघाडी कधीच समजू शकत नाहीत आणि त्यांना कोणत्याही आघाडीमध्ये सहभागी होण्याची गरज वाटत नाही. “मला राजकारण (Politics) कसे करावे हे माहित नाही आणि मला त्यांची 10 किंवा त्याहून अधिक पक्षांची आघाडी आणि कोणाला पराभूत करण्यासाठी तयार केलेली आघाडीही समजत नाही. मला कोणाचा पराभव करायचा नाही, मला देश जिंकायचा आहे.”

Advertisement

काही राज्ये आणि अगदी देश आर्थिक अस्थिरतेकडे जात असल्याच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल म्हणाले की, अशा आशंका निराधार आहेत. ते म्हणाले, की “हे सर्व अर्थतज्ज्ञ लिहित आहेत की सबसिडी संस्कृती (Subsidy Culture) देशाचा नाश करेल. पण, भ्रष्टाचाराची संस्कृती (Corruption Culture ) देशाचा नाश करेल असे त्यांनी कधीच लिहिले नाही. मी फुकटात वस्तू देऊ शकतो कारण आम्ही भ्रष्टाचार संपवला आहे. त्यामुळे वाचलेले पैसे लोकांना परत केले जातात.” केजरीवाल म्हणाले की, त्यांच्या पक्षाचे लक्ष 2024 च्या लोकसभा निवडणुकीवर (Loksabha Election) नसून देशासाठी काम करण्यावर आहे. ते म्हणाले की, त्यांच्यासारख्या लोकांनी देशाची सेवा करण्यासाठी आपले करिअर देखील सोडले आहे.

Loading...
Advertisement

गुजरातबाबत मोदींनी घेतला मोठा निर्णय?; केजरीवालच्या ‘त्या’ ट्विट नंतर अनेक चर्चांना उधाण

Advertisement

केजरीवाल संतापले..! म्हणाले, तर आम्ही राजकारणच सोडून देऊ; पहा, काय दिलेय भाजपला आव्हान..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply