Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अमित शहांच्या दौऱ्याआधीच ‘या’ राज्यात भाजपला जोरदार झटका; पहा, काय घडलेय राजकारणात..

कोलकाता – विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) भाजपला सातत्याने झटके बसत आहेत. आतापर्यंत अनेक जण भाजप (BJP) सोडून गेले आहेत. आता तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या दौऱ्याआधीच राज्यात भाजपला पुन्हा एकदा जोरदार झटका बसला आहे. बंगालमधील पक्षीय मतभेद मिटवण्याची जबाबदारी स्वत: गृहमंत्री अमित शहा यांनी घेतल्याचे वृत्त आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 4 मे रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जात आहेत. त्यांच्या बंगाल दौऱ्याला एका आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक असताना, रविवारी कोलकाता (Kolkata) लगतच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील संघटनात्मक समितीच्या 15 पदाधिकाऱ्यांनी एकाच वेळी राजीनामा (Resignation) दिला.

Advertisement

भाजप नेतृत्वाने राज्य युनिटला पक्षातील अंतर्गत वाद संपवण्याचा आणि शाह यांच्या 4 मेपासून सुरू होणाऱ्या दौऱ्यापूर्वी एकसंघ प्रतिमा तयार करण्याचे आदेश जारी केल्यानंतर पक्षाच्या नेत्यांमधील असंतोष समोर आला. पोटनिवडणुकीतील पराभवानंतर पक्षांतर्गत मतभेद निर्माण झाले आहेत. पोटनिवडणुकीत आसनसोल लोकसभा जागा राखण्यात पक्षाला अपयश आले होते. प्रदेश सचिवांसह तीन आमदारांनी राज्य पदाचे राजीनामे दिले होते. याशिवाय नादियातील 14 जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांनी पोटनिवडणुकीचा निकाल लागल्यानंतर 48 तासांत राजीनामे दिले होते.

Loading...
Advertisement

उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील सर्व असंतुष्टांनी जिल्हाध्यक्षांवर पक्षपाताचा आरोप केल्याचे वृत्त आहे. जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करून “अक्षम” चेहरे समोर आणल्याचा आरोपही त्यांनी पक्षावर केला. राजीनामा देणारे पदाधिकारी, श्यामल रॉय म्हणाले, की केवळ जवळच्या लोकांनाच प्राधान्य दिले नाही. तर ते तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांमध्ये देखील सहभागी आहेत आणि आमच्या प्रतिस्पर्ध्यांना नागरी निवडणुकीत फायदा मिळवून देण्यास मदत करत आहेत.

Advertisement

West Bengal : बंगालमध्ये भाजपला आणखी एक झटका.. पहा, आता काय घडलेय राज्याच्या राजकारणात..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply