Take a fresh look at your lifestyle.

.. म्हणून भारताला कोणाच्याही उपदेशाची गरज नाही; परराष्ट्र मंत्र्यांनी ‘त्या’ मुद्द्यावर युरोपला फटकारले..

दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S. Jayshankar) यांनी बुधवारी नवी दिल्लीत सुरू असलेल्या रायसीना संवादात सांगितले की, भारत जगाबरोबर आता स्वतःच्या अटींवर संवाद साधील. यामध्ये भारताला कोणाच्याही उपदेशाची आजिबात गरज नाही. जयशंकर म्हणाले की, जगाने आपल्याला सांगावे आणि आपण जगाची परवानगी घ्यावी ती वेळ आता केव्हाच निघून गेली आहे.

Advertisement

आगामी 25 वर्षांत भारत जागतिकीकरणाचे केंद्र असेल, असे परराष्ट्रमंत्री म्हणाले. जेव्हा आपण 75 वर्षांकडे मागे वळून पाहतो तेव्हा आपल्याला केवळ 75 वर्षे उलटून गेलेलीच नाही तर येणारी 25 वर्षेही दिसतात. आपण काय मिळवले आणि आपण कशात अयशस्वी ठरलो? तरी एक गोष्ट जी आपण जगाला सांगू शकलो ती म्हणजे भारत हा लोकशाही देश आहे.

Advertisement

रशिया-युक्रेन युद्धाबाबत एस जयशंकर म्हणाले की, युद्ध (War) थांबवण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे दोन्ही देशांनी वाटाघाटीच्या करणे. रशियाबरोबरील (Russia) व्यापाराबाबत परराष्ट्रमंत्री म्हणाले की, आवाहनासारख्या आदेशांना आता आशियामध्ये आव्हान दिले जात आहे. ते म्हणाले की, रशियाबरोबरील व्यापाराबाबत आम्हाला युरोपकडून (Europe) उपदेश मिळाला आहे की रशियाबरोबर आणखी व्यापार करू नये. निदान आम्ही तरी कुणाला उपदेश देण्याच्या भानगडीत पडत नाही.

Advertisement

जयशंकर पुढे म्हणाले की, आधीच्या काळात चीनने (China) दिलेल्या धमक्यांकडे युरोपने लक्ष दिले नाही. चीन आशियाला धोका देत असतानाही युरोप निष्काळजीपणा दाखवत होता. याबरोबरच चीनसोबतच्या सीमावादावर ते म्हणाले की, हे असे क्षेत्र आहे जिथे अद्याप सीमारेषा ठरलेली नाही. जगातील विविध देशांतील लोकांचा एक मंच आहे जिथे जागतिक परिस्थिती आणि आव्हानांवर अर्थपूर्ण चर्चा करण्याच्या उद्देशाने रायसीना संवाद सुरू करण्यात आला होता. यामध्ये 100 हून अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी होतात. रायसीना संवाद केंद्र सरकारने 2016 मध्ये सुरू केला होता. तेव्हापासून, या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या देशांची आणि लोकांची संख्या दरवर्षी वाढत आहे. भू-राजकारण आणि भू-अर्थशास्त्र या मुद्द्यांवरील ही देशाची प्रमुख परिषद आहे.

Advertisement

.. म्हणून भारत आहे रशियाचा खरा मित्र.. अमेरिकेनेही मान्य केलेय स्वतःचे ‘ते’ अपयश

Advertisement
Advertisement

Leave a Reply