Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

कडाक्याच्या उन्हाळ्याने सरकारलाही फोडलाय घाम..’तिथे’ विजेच्या वापराने मोडलेत सगळेच रेकॉर्ड..

दिल्ली : कडाक्याच्या उन्हाळ्याने फक्त दिल्लीकरांनाच नाही तर सरकारलाही चांगलाच घाम फोडला आहे. एकतर दिल्लीत सध्या तापमान प्रचंड वाढले आहेत. या वाढत्या तापमानाने (Temperature) नागरिक अगदीच हैराण झाले आहेत. त्यामुळे विजेच्या मागणीत (Power Demand) इतकी वाढ झाली आहे, की खुद्द सरकार हैराण झाले आहे. एप्रिल महिन्यात पहिल्यांदाच विजेची मागणी सहा हजार मेगावॅटवर पोहोचली. दिल्लीत काल दुपारी विजेची मागणी 6,000 मेगावॅट होती. एसएलडीसीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी विजेची मागणी 5769 मेगावॅट होती, जी गुरुवारी 3.7 टक्क्यांनी वाढली.

Advertisement

अधिकाऱ्याने सांगितले की, दिल्लीमध्ये यावर्षी कडक उन्हाळा आहे, त्यामुळे लोक त्यांच्या घरांमध्ये आणि कार्यालयांमध्ये कूलर-एसी वापरत आहेत. त्याचा थेट परिणाम विजेच्या वापरावर होत आहे. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, महिन्याच्या सुरुवातीपासून दिल्लीतील विजेची मागणी 34 टक्क्यांनी वाढली आहे. 1 एप्रिल रोजी विजेची मागणी 4469 मेगावॅट होती. यावर्षी जास्तीत जास्त मागणी 8200 मेगावॅटपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Advertisement

शहरात 28 एप्रिल 2022 रोजी विजेची कमाल मागणी 6000 मेगावॅट आहे. 19 एप्रिल रोजी विजेची कमाल मागणी 5735 मेगावॅट होती. 16 एप्रिल 2021 मध्ये विजेची कमाल मागणी 4372 मेगावॅट होती. 30 एप्रिल 2020 मध्ये विजेची कमाल मागणी 3362 मेगावॅट होती. 30 एप्रिल 2019 रोजी कमाल वीज मागणी 5664 मेगावॅट होती. तसेच 30 एप्रिल 2018 रोजी कमाल वीज मागणी 5664 मेगावॅट होती.

Loading...
Advertisement

दिल्लीचे ऊर्जा मंत्री सत्येंद्र जैन यांनी पुरेशा कोळशाच्या पुरवठ्याबाबत (Coal Supply) केंद्राला पत्र लिहिले आहे. दादरी-नॅशनल कॅपिटल पॉवर स्टेशन आणि आणखी एका पॉवर प्लांटमधून वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे दिल्ली मेट्रो, रुग्णालयांसह अनेक महत्त्वाच्या संस्थांना 24 तास वीज पुरवठ्यात अडचण येऊ शकते, असे लिहिले आहे. आता केंद्र सरकार यावर काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement

‘त्यामुळे’ वाढल्यात उष्णतेच्या लाटा.. पहा, कशामुळे घडलाय पर्यावरणात ‘हा’ मोठा बदल..

Advertisement
Advertisement

Leave a Reply