Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

विरोधकांना जोरदार झटका..! ‘केसीआर’ यांनी भाजपबाबत केलाय ‘हा’ मोठा खुलासा..

मुंबई : तेलंगणा राष्ट्र समितीचे (TRS) अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी बुधवारी सांगितले, की 2024 च्या लोकसभा निवडणुकीआधी (Loksabha) बिगर-काँग्रेस आणि गैर-भाजप पक्षांची राजकीय आघाडी स्थापन करण्याच्या बाजूने मी नाही. ते म्हणाले की, सध्या आघाडीऐवजी टीआरएसच्या धर्तीवर देशाला पर्यायी अजेंड्याची गरज आहे. पक्षाच्या 21 व्या स्थापना दिनाच्या बैठकीत केसीआर म्हणाले की डाव्या पक्षांनी नुकतीच भेट घेतली आणि भाजपला केंद्रातून बाहेर काढण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्यास सांगितले. मी त्यांना स्पष्टपणे सांगितले की, त्यांना हटवण्याची किंवा पंतप्रधान करण्याचा विचार योग्य नव्हता.

Advertisement

त्यांचे हे वक्तव्य गेल्या काही महिन्यांत भाजपविरोधात सातत्याने केलेल्या वक्तव्यापेक्षा खूप वेगळे आहे, हे विशेष. त्यांनी 11 एप्रिल रोजी दिल्लीत धरणे आंदोलन करून लोक केंद्रातील सरकार पाडतील असे सांगितले होते. मात्र, बुधवारी आपल्या भाषणा दरम्यान ते म्हणाले की, देशाला तातडीने पर्यायी अजेंड्याची गरज आहे. ते म्हणाले की ‘टीआरएस हा प्रादेशिक पक्ष आहे, त्यामुळे त्यांना टीआरएसचे राष्ट्रीय पक्षात रूपांतर करण्याच्या सूचनाही मिळाल्या होत्या. याबरोबरच टीआरएसचे नाव बदलून ‘भारतीय राष्ट्र समिती (BRS)’ करण्याच्या सूचनाही आल्या आहेत.

Loading...
Advertisement

जर हैदराबाद देशाची दिशा बदलू शकत असेल तर तेलंगणातील लोकांसाठी हा अभिमानाचा क्षण असेल,” असे ते म्हणाले. पर्यायी अजेंडा तयार करण्यात आणि देशाला नवी दिशा देण्यात टीआरएस महत्त्वाची भूमिका बजावेल, असे स्पष्ट करून केसीआर म्हणाले की, पर्यायी शक्ती लवकरच उदयास येईल आणि राजकीय वादळ निर्माण करेल.

Advertisement

आम आदमीने केलाय जोरदार प्लान..! ‘त्या’ 9 राज्यांसाठी घेतलाय ‘हा’ मोठा निर्णय; भाजप-काँग्रेसला होणार ताप..

Advertisement
Advertisement

Leave a Reply