Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. कडाक्याच्या उन्हाळ्याने ‘या’ राज्यात उडालाय हाहाकार; हवामान विभागाने दिला ‘हा’ इशारा..

दिल्ली : वायव्य भारतात उष्णतेची लाट (Heat Wave) सुरूच आहे आणि त्याच दरम्यान दिल्लीत बुधवारी बहुतांश भागात कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसची वाढ झाली. हवामान खात्याने (IMD) 28 एप्रिलपासून उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट (Yellow Alert) इशारा जारी केला आहे. दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात उष्णतेची लाट कायम आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उष्मा आणखी वाढणार आहे. राजधानी दिल्लीबद्दल सांगितले तर, बुधवारी तापमान (Temperature) मागील दिवसाच्या तुलनेत दोन ते तीन अंशांनी अधिक होते. दिल्लीच्या सफदरजंग वेधशाळेत मंगळवारी 40.8 अंश सेल्सिअस कमाल 41.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Advertisement

त्याच वेळी, नजफगढमध्ये 43.7 अंश सेल्सिअस आणि अन्य ठिकाणी 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. भारतीय हवामान विभागाच्या मते, सफदरजंग वेधशाळेतील कमाल तापमान गुरुवारी 43 अंश सेल्सिअस आणि शुक्रवारी 44 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, दिल्लीच्या काही भागात कमाल तापमान 46 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

Advertisement

राजधानी दिल्लीत 21 एप्रिल 2017 रोजी कमाल तापमान 43.2 अंश सेल्सिअस नोंदले गेले. 29 एप्रिल 1941 रोजी एप्रिलमध्ये कमाल तापमान 45.6 अंश सेल्सिअस नोंदले गेले होते.

Loading...
Advertisement

मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून उत्तर-पश्चिम भारतात सामान्य तापमानापेक्षा जास्त तापमान नोंदले गेले आहे. हवामान तज्ज्ञ उत्तर भारतात वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या गैरहजेरीला दोष देत आहेत. अफगाणिस्तानवरील पश्चिम विक्षोभाच्या प्रभावामुळे ढगाळ आकाशामुळे गेल्या आठवड्यात या प्रदेशाला थोडासा दिलासा मिळाला होता. 28 एप्रिलपासून राष्ट्रीय राजधानीत उष्णतेच्या लाटेच्या स्थितीसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्लीत शुक्रवार आणि रविवारी अंशतः ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे. हलका पाऊस आणि वाऱ्याचा वेग ताशी 50 किमीपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे.

Advertisement

राज्याला बसणार अवकाळी पावसाचा फटका; ‘या’ भागात पुढच्या 24 तासांत पडणार गारपीट

Advertisement
Advertisement

Leave a Reply