Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आटपा लवकर.. नाहीतर रेशन होईल बंद..! पहा नेमके काय करावे लागणार आहे ते

Please wait..

मुंबई : तुम्हीही शिधापत्रिकाधारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. केंद्र सरकारकडून वन कार्ड वन नेशनवर (One Card One Nation) वेगाने काम सुरू आहे. याअंतर्गत तुम्हाला कोणत्याही राज्यातील कोणत्याही दुकानातून रेशन मिळू शकेल. यासाठी लाभार्थ्यांना त्यांचे रेशन कार्ड आणि आधार लिंक करावे लागेल.

Advertisement
Loading...

जर तुम्ही तुमचे रेशन कार्ड आधारशी लिंक केले नसेल तर भविष्यात अडचणी येऊ शकतात. यासाठी आधार आणि शिधा वेळेत जोडणे आवश्यक आहे. यापूर्वी सरकारने यासाठी ३१ मार्चची मुदत निश्चित केली होती. मात्र आता आधार लिंक करण्याची तारीख ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. शिधापत्रिकाधारकांना कमी किमतीत रेशन मिळण्यासोबतच आणखी अनेक फायदे मिळतात. केंद्राने ‘एक राष्ट्र एक रेशन कार्ड’ योजना सुरू केली आहे. याचा लाभ लाखो लोक घेत आहेत. तुम्ही रेशन कार्डशी आधार लिंक करून ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजनेचा लाभही घेऊ शकता.

Advertisement
  • रेशन कार्ड आधारशी असे लिंक करावे :
  • सर्वप्रथम gov.in या आधाराच्या वेबसाइटवर जा.
  • येथे ‘Start Now’ वर क्लिक करा.
  • येथे तुमचा पत्ता आणि जिल्हा इत्यादी तपशील प्रविष्ट करा.
  • त्यानंतर ‘रेशन कार्ड बेनिफिट’ या पर्यायावर क्लिक करा.
  • येथे तुमचा आधार कार्ड क्रमांक, रेशन कार्ड क्रमांक, ई-मेल पत्ता आणि मोबाईल क्रमांक इ. प्रविष्ट करा.
  • ते भरल्यानंतर नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर OTP येईल.
  • तुम्ही OTP टाकताच तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर प्रक्रिया पूर्ण झाल्याचा संदेश मिळेल.
  • ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमच्या आधारची पडताळणी केली जाईल. तसेच आधार आणि रेशन कार्ड लिंक केले जाईल.

रेशनकार्डशी आधार लिंक करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे म्हणजे आधार कार्डची प्रत, शिधापत्रिकेची प्रत आणि शिधापत्रिकाधारकाचा पासपोर्ट आकाराचा फोटो रेशनकार्ड केंद्रावर जमा करावयाचा आहे. याशिवाय तुमच्या आधार कार्डचे बायोमेट्रिक डेटा व्हेरिफिकेशन रेशनकार्ड केंद्रावरही केले जाऊ शकते. (ration card link to aadhaar number is compulsory information in Marathi)

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply