Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Navneet & Ravi Rana show: बच्चू कडू यांनीही घेतली उडी..! पहा नेमके काय म्हटलेय त्यांनी

Please wait..

मुंबई : मशिदींवरील भोंगे उतरवण्याचे राजकारण आता रंगत आहे. भाजप आणि मनसे या पक्षाच्या ऐवजी आता यात राणा दांपत्याने यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा केली आहे. सध्या इतर सर्व मुद्दे सोडून माध्यमे आणि राजकारणी याच जनतेच्या महत्वाच्या मुद्द्यावर काथ्याकुट करीत आहेत. एकूणच सध्या राणा यांचा भावनिक व धार्मिक राजकीय शो सगळीकडे बेफाम चालू आहे.

Advertisement

Advertisement
Loading...

अमरावतीचे आमदार रवी राणा यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या मदतीने निवडून आलेल्या होत्या. मात्र, आता त्यांनी याच पक्षासह एकून महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले आहे. महाराष्ट्रावर आलेल्या संकटाच्या मुक्तीसाठी आम्ही मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करणार आहोत. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचं नाव घेत वारंवार मत मागितली आहेत. पण तेच आता हिंदुत्वाचा विरोध करत आहेत. म्हणून सकाळी नऊ वाजता मातोश्रीवर जाणार असल्याचे रवी राणा यांनी पत्रकार परिषदेत सागितले होते. त्यानुसार सध्या यावरून राजकारण पेटले आहे. (Prahar Sanghatna Bachchu Kadu Navneet Rana Ravi Rana Shivsena Uddhav Thackeray Matoshree Hanuman Chalisa)

Advertisement

Advertisement

दरम्यान, मंत्री बच्चू कडू यांनी याबाबत म्हटले आहे की, हा अतिशय मूर्खपणा आहे. कोणते मुद्दे घ्यावेत याचं कोणतंही भान राणांना राहिलेलं दिसत नाही. प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी हा सगळा प्रकार सुरु असून सामान्य माणसाशी संबंध नसलेले मुद्दे घेऊन आपला अपमान कऱण्याच्या सोयीने ते जात आहेत. उलट निवडून येताना राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला आणि आता वेगळ्या विचारधारेचा पाठिंबा घेत आहेत. ही मतदारासोबत फार मोठी बेईमानी आहे. ‘वाघाची नखं अजूनही धारदार आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावं’ असे सांगून मंत्री कडू यांनी म्हटले आहे की, ज्या विचारधारेवर निवडून आले ती कायम ठेवली नाही उलट त्यावर आक्रमण करत आहेत. शिवसेनेच्या, उद्धव ठाकरेंच्या वाटेला गेलात तर काय होईल सांगता येणार नाही.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply